esakal | झाली का पंचाईत : आता दाेन दिवस टाेल भरावाच लागणार
sakal

बोलून बातमी शोधा

झाली का पंचाईत : आता दाेन दिवस टाेल भरावाच लागणार

तरी मुख्य मार्गावरील वाहतूक बंद राहणार असून गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून धुरुंगमळा ते उत्तर कोपर्डे रेल्वे बोगदा या मार्गावरून वाहतूक सुरू राहील.

झाली का पंचाईत : आता दाेन दिवस टाेल भरावाच लागणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोपर्डे हवेली  (जि. सातारा ) : कराड-मसुर मुख्य रस्त्यावरील फाटक क्रमांक ९६ रविवार आठ मार्च आणि सोमवार नऊ मार्च या कालावधीत रेल्वे रुळ आणि तांत्रिक दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबतची माहिती कराड कार्यालयाचे सिनीअर सेक्शनल इंजिनिअर सी.के.झा यांनी दिली आहे.

झा म्हणाले रविवार आठ मार्च या दिवशी सकाळी सात ते सोमवारी नऊ मार्च या दिवशी सायंकाळी आठ या कालावधीपर्यंत रेल्वे रुळाच्या दुरुस्तीसह फाटकाच्या आतील तांत्रिक दुरुस्तीसाठीचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे रेल्वे गेट बंद राहणार आहे. संबंधित रेल्वे गेट बंद राहणार असल्याने संबधित ग्रामपंचायत व सह्याद्री साखर कारखाना प्रशासनास कळविण्यात आले आहे. तरी मुख्य मार्गावरील वाहतूक बंद राहणार असून गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून धुरुंगमळा ते उत्तर कोपर्डे रेल्वे बोगदा या मार्गावरून वाहतूक सुरू राहील. तरी सर्वांनी याची दक्षता घ्यावी तसेच रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन कराड कार्यालयाचे सिनीअर सेक्शनल इंजिनिअर सी.के.झा यांनी केले आहे.

दरम्यान तासवडे (जि. सातारा) येथील टाेल चुकविण्यासाठी उंब्रज, मसूर तसेच सह्याद्री कारखाना या रस्त्यावरुन माेठ्या प्रमाणात वाहतुक हाेत असते. यामध्ये माेठ्या प्रमाणात माल वाहतुकदार देखील असतात. या मार्गावरुन प्रवासी वाहतुक देखील हाेत असते. या सर्वांना आगामी दाेन दिवस रेल्वे गेट बंद असल्याने काेणत्याही परिस्थितीमध्ये टाेल चुकवता येणार नाही अशी परिस्थिती वाहनधारकांवर उदभवली आहे. 

वाचा : महिला सुरक्षिततेसाठी जवानांची बंगळूर ते सातारा सायकल रॅली

कोपर्डे हवेली : शनिवारी (ता. 7) रोजी सायंकाळी सहा वाजता कोपर्डे हवेली येथे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत स्थापित कृषीसंगम फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य सहकार व पणन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी जिल्हा कृषी अधिक्षक श्री. झेंडे, कृषी उपसंचालक विजयकुमार राऊत, कऱ्हाड तालुका कृषी अधिक्षक आर. एम. मुल्ला, सैदापूर कृषी मंडल अधिकारी श्री. येळे, सह्याद्री कारखान्याचे संचालक शंकरराव चव्हाण, माजी संचालक बळवंतराव चव्हाण, शेती उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती हिंदूराव चव्हाण, कोयना दूध संघाचे संचालक सुदाम चव्हाण, आशुतोष पंत, अमोल पवार, एस. व्ही. गुजले, अमित पाटील, महादेव बरडकर, सरपंच मेघना होवाळ, उपसरपंच लक्ष्मण चव्हाण, एकनाथ चव्हाण, एस. डी. चव्हाण, महादेव चव्हाण, उत्तम चव्हाण, प्रल्हाद पाटील, लालासो चव्हाण, नेताजी चव्हाण, आर. आर. चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. 

loading image