esakal | Video : महिला सुरक्षिततेसाठी जवानांची बंगळूर ते सातारा सायकल रॅली
sakal

बोलून बातमी शोधा

Video : महिला सुरक्षिततेसाठी जवानांची बंगळूर ते सातारा सायकल रॅली

सेवानिवृत्त जवानांचा आज (शुक्रवारी) सातारा येथे सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सत्कार होणार आहे. तत्पुर्वी सर्वांचे पाेवई नाका येथे धूमधडाक्यात स्वागत करण्यात आले. 

Video : महिला सुरक्षिततेसाठी जवानांची बंगळूर ते सातारा सायकल रॅली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड ः बंगळूर येथील आर्मी सर्व्हिस क्रॉप्समधून 30 जवान निवृत्त झाले. त्यातील नीलेश गोगावले, विनोद चोरट या जवानांनी सामाजिक एकतेचा संदेश देऊन महिलांच्या सुरक्षिततेसाठी सायकलवरून बंगळूरहून रॅली काढली आहे. आज (शुक्रवार) सातारा शहरात त्यांचे आगमन हाेताच नागरीकांनी भारतमाता की जय...छत्रपती शिवाजी महाराज की जय...अशा घाेषणा देत परिसर दणाणून साेडला. दरम्यान गुरुवारी (ता.5) सर्व जवानांचे कराड येथील विजय दिवस चौकात विजय दिवस समारोह समिती, चचेगाव, आटके, कार्वे व अन्य गावच्या ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा जिलेबी वाटून जंगी सत्कार करून जोरदार स्वागत करण्यात आले.
 
सैन्यदलाच्या बंगळूर येथील आर्मी सर्व्हिस क्रॉप्समधून श्री. गोगावले, श्री. चोरट, तानाजी कोळपे, अमोल सावंत, सचिन शिर्के, विजय मोरे, तुषार महांगडे, उमेश कुलकर्णी, विठ्ठल हुलवान, शिवाजी पाटील, विजय पवार, विनायक पवार, विजय जाधव अन्य असे 30 जवान 1 मार्चला निवृत्त झाले. त्यांचा आज (शुक्रवार) सातारा येथे सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सत्कार होणार आहे. त्यातील नीलेश गोगावले, विनोद चोरट हे बंगळूरवरून सायकलवरून एकता आणि महिलांच्या सुरक्षिततेचा संदेश देताहेत.

गुरुवारी (ता.5) सायंकाळी त्यांचे कऱ्हाडमध्ये जंगी स्वागत करण्यात आले. येथील विजय दिवस चौकातील विजय स्तंभास जवानांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर त्यांचे पोलिस उपनिरीक्षक कांबळे, हवालदार श्री. करांडे, विजय दिवस समितीच्या वतीने चंद्रकांत जाधव, समितीचे सहसचिव विलासराव जाधव, ऍड. परवेज सुतार, श्री. चौधरी, ग्रामस्थ व जवानांच्या वतीने गजानन हुलवान, देवानंद हुलवान, विठ्ठल हुलवान, दादासाहेब मंडले, शामराव मदने, संभाजी चव्हाण, काकासाहेब बोडरे, हनीप शिकलगार व सहकाऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी जिलेबी वाटप करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

सैन्य दलातून निवृत्त झालेल्या 30 जवानांचे आज (शुक्रवार) शाहूनगरीत आगमन झाले. येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौकात जय हिंद व हिरकणी फाउंडेशनच्या वतीने त्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. त्यानंतर सर्व जवान मिरवणुकीने पोवई नाक्‍यावर आले. तेथे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले. त्यानंतर सर्व जवान व त्यांच्या कुटुंबीयांनी दैनिक "सकाळ' कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. सकाळ कार्यालयाला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेल्या जवानांचे सहयोगी संपादक राजेश सोळसकर व व्यवस्थापक राजेश निंबाळकर यांच्यासह कर्मचारी वर्गाने स्वागत केले. त्यांच्या भावी आयुष्यास सदिच्छा दिल्या.हेही वाचा : कऱ्हाड ः आता पावसकरांनी 'या'मध्ये लक्ष घालू नये

नक्की वाचा :  ब्रेकिंग : कर्नाटकच्या दाेन बस महाराष्ट्रात जप्त

वाचा : त्याला व्हायचे हाेते माेठा कीर्तनकार पण...

हेही वाचा : "बुलाती है मगर जानेका नहीं"

loading image
go to top