Koyna Dam Water Dispute : कोयनेचे पाणी मुंबईला नको, आधी पश्चिम महाराष्ट्राला द्या; दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी काँग्रेस आक्रमक, तहसीलदारांकडे केली 'ही' मागणी

Koyna Dam water diversion controversy : कोयना धरणातील पाणी मुंबईऐवजी सांगली, सातारा आणि सोलापूरमधील दुष्काळग्रस्त भागांना द्यावे, अशी मागणी कवठेमहांकाळ तालुका काँग्रेसने निवेदनाद्वारे केली असून शेती व पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्याची मागणी केली आहे.
Koyna Dam water for Sangli farmers

Koyna Dam water for Sangli farmers

esakal

Updated on: 

कवठेमहांकाळ : कोयना हे पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे धरण आहे. मात्र पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, सोलापूर व इतर दुष्काळी भागांतील शेतकरी आणि नागरिक आजही टंचाईचा सामना करत आहेत. अनेक गावांमध्ये पिण्याच्या, तसेच शेतीच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत (Koyna Dam water for Western Maharashtra) आहे. अशा स्थितीत कोयना धरणातील पाणी मुंबईकडे वळविण्याऐवजी पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी जनतेला प्राधान्याने उपलब्ध करून द्यावे. या पाण्याचा उपयोग शेती, पिण्याचे पाणी आणि दुष्काळग्रस्त भागातील सिंचनासाठी करावा, याबाबतचे निवेदन तालुका काँग्रेस कमिटीतर्फे तालुकाध्यक्ष अविराजे शिंदे यांच्या शिष्टमंडळाने निवेदन निवासी नायब तहसीलदार संजय पवार यांना दिले.

Loading content, please wait...

Related Stories

Maharashtra Koyna Water Row Sparks Protest in Sangli Demand Grows to Prioritize Irrigation in Western Maharashtra
Koyna Dam 2100 cusecs water discharge
Koyna dam water release increased to 2100 cusecs
Koyna Dam water allocation dispute