

Maharashtra Koyna Water Row Sparks Protest in Sangli Demand Grows to Prioritize Irrigation in Western Maharashtra
sakal
सांगली : कोयना धरणातून विद्युतनिर्मितीनंतर समुद्राला जाणारे पाणी मुंबईकडे वळवण्याच्या प्रस्तावाला जिल्ह्यातील जल अभ्यासक आणि राजकीय नेत्यांनी कडाडून विरोध केला आहे. हे पाणी उपसून पुन्हा पश्चिम महाराष्ट्राला द्यावे किंवा विद्युतनिर्मिती बंद करावी. या पाण्याचा वापर दुष्काळ हटवण्यासाठी करावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे. त्यांची मते ‘सकाळ’ने जाणून घेतली.’