Flood Alert in Miraj: मिरज कृष्णा घाटावरील कुरणे, गोरे आणि जाधव मळ्यातील जनावरांचे कृष्णा घाटावर स्थलांतर करण्यात आले. घाटावरील स्मशानभूमीत नदीचे पाणी गेले दोन दिवस ठाण मांडून राहिल्यामुळे मिरज-पंढरपूर रस्त्यावरील स्मशानभूमीचा पर्यायी वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले.
Krishna River Crosses 50 Ft Mark; Villagers Move 150 Cattle from GhatsSakal
मिरज: कोयना, वारणा धरण क्षेत्रात सतत पडणाऱ्या पावसामुळे मिरजेत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. सकाळी ४५ फुटांवर असलेल्या कृष्णा नदी रात्री पन्नासपर्यंत पोहोचली. स्मशानभूमीसह नाल्यात पाणी शिरले.