कृष्णा नदीला पूर; चिंधवली-पाचवडला जोडणारा पूल पाण्यात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

वाई, पाचगणी, महाबळेश्वर परिसरात तसेच धोमधरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीला पूर आला असून चिंधवली -पाचवड गावाला जोडणारा नवीन पूल पाण्याखाली गेला आहे. तर यापूर्वीच खड़की येथील पुल पाण्याखाली गेला आहे. परिणामी खड़की, चिंधवली गावांचा महामार्गशी असणारा संपर्क तुटला आहे.

कृष्णा नदीला पुर - वाई तालुक्याती चिंधवली,खड़की गावांचा संपर्क तुटला 
भुईंज - वाई, पाचगणी, महाबळेश्वर परिसरात तसेच धोमधरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीला पूर आला असून चिंधवली -पाचवड गावाला जोडणारा नवीन पूल पाण्याखाली गेला आहे. तर यापूर्वीच खड़की येथील पुल पाण्याखाली गेला आहे. परिणामी खड़की, चिंधवली गावांचा महामार्गशी असणारा संपर्क तुटला आहे.

वाई तालुक्यात, त्यातही कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने कृष्णा नदीवरील धोम धरण पूर्ण टक्के  भरले असून आज नदीपात्रात २० हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे कृष्णानदीत पावसाळा सुरु झाल्यापासूनच पाणी पातळीत वाढ झाली होती.

धोमधरणातून वेळोवेळी पाणी सोडल्यानंतर पाणी पुलावरून वाहू लागले. त्यामुळेचिंधवली, खडकीला जाणारी वाहतुक बंद झाली. सायंकाळी उशीरापर्यंत नदीचे पाणी कमी झाले नव्हते पाण्याने धोक्याची पातळी ओलांड्याने परिसरातील गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
सकाळपासून सकाळपासून कृष्णानदीला आलेले पाणी पाहण्यासाठी परिसरातील नागरिक  गर्दी करत आहे. दरम्यान तालुक्यातील इतर गावांमध्येही सकाळपासून संततधार पाऊस सुरू आहे.

'पूलाचा श्रेयवाद तरीही येरे माझ्या मागल्या'
चिंधवली-पाचवडला जोडणारा जूना पूल प़त्येक पावसाळयात पाण्याखाली जात असल्याने लोकांंच्या गैरसोय होत होती. नवीन पूलाची अनेक वर्षाची मागणी होती,मात्र, कांग्रेस व राष्ट़वादीत या पूलाचा श्रेयवाद सुरु होता.त्यामुळे या पूलाचे उदघाटन दोनवेळा झाले.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या फंडातून झाल्याने खासदार गजानन बाबर यांनी व आमदार मकरंद पाटील यांच्या फंडातून माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याहस्ते असे दोनवेळा उदघाटन झाले. तरीही आज पुलावर पाणी आल्याने येरे माझ्या मागल्या हि स्थिती चिंधवली व पाचवड ग़ामस्थांची झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Krishna River Flood Rain Water Chindhwali Bridge Underwater