
बहे : ‘कृष्णे’ला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या ग्रामस्थांची धावपळ उडाली आहे. आज पहाटेपासूनच पाणी'पातळीत झपाट्याने वाढ होऊ लागल्याने नदीकाठच्या गावांत धास्ती निर्माण झाली आहे. सकाळपासूनच नदीकाठच्या ग्रामस्थांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात येत आहे. सायंकाळपर्यंत नदीकाठच्या ५२ कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले. सकाळी ११ वाजता ताकारी पूल पाण्याखाली गेला आहे. सायंकाळपर्यंत तालुक्यातील नऊ रस्त्यांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.