
बंगळूर : भारतातील तिसरी सर्वांत लांब असलेली कृष्णा नदी कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगण आणि आंध्र प्रदेशामुळे दूषित झाली आहे. नदीत सोडल्या जाणाऱ्या अनियंत्रित औद्योगिक आणि इतर सांडपाण्याचा हा परिणाम आहे, असे वारंगळ येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (एनआयटी) प्राथमिक अहवालात म्हटले आहे.