कृष्णेची पातळी घटली, वारणेत वाढ कायम...कोयना पाणलोटात पावसाचा जोर ओरसला

विष्णू मोहिते
Friday, 7 August 2020

सांगली- कोयना धरण पाणलोटासह जिल्ह्यात पावसाचा जोर आज ओसरल्यामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी स्थिर आहे. सध्यातरी महापुराचा धोका टळला आहे. सांगलीतील आयर्विन पुलाची पाणी पातळी 23 फुटावर होती. चांदोली धरणात 29.25 टी.एम.सी. पाणीसाठा झाल्यामुळे धरणाचे चार दरवाजे उघडले असून धरणातून 6500 क्‍युसेकने विसर्ग सुरु आहे. यामुळे वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. एका पुलासह आठ बंधारे चौथ्या दिवशीही पाण्याखाली राहिले आहेत. सांगली जिल्ह्यातील मध्य भागात हलक्‍या सरी तर पूर्व भागात उघडीप दिली आहे. 

जिल्ह्यात गेल्या दोन दिवस संततधार पाऊस कोसळत असल्यामुळे कृष्णा, वारणा नद्यांची पाणी पातळी वेगाने वाढत होती. चांदोली धरण परिसरात पावसाचा जोर कायम आहे. सलग चौथ्या दिवशी येथे अतिवृष्टी झाली आहे. गेल्या 24 तासात 88 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा जोर कायम असल्यामुळे दुपारी चार वाजता धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढवला. 4400 क्‍युसेक्‍स वरुन 6500क्‍युसेक्‍स वारणा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. अनेक ठिकाणी वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर गेले आहे.

वारणा नदीवरील पाण्याखाली गेलेला काखे-मांगले पूल आणि आठ बंधारे चौथ्या दिवशीही कायम राहिले आहेत. कोयना धरण परिसरातही पावसाचा जोर कायम आहे. तेथे चोवीस तासात 153 मिलिमिटर पाऊस पडला. धरणाची क्षमता 105.25 टी.एम.सी. असून सध्या धरणात 70.03 टी.एम.सी. पाणीसाठा आहे. महाबळेश्वर, धोम आणि कण्हेर याठिकाणीही जोरदार पाऊस होत आहे. 
सांगली, मिरज शहरांसह जिल्ह्यातही दिवसभर पावसाची उघडझाप सुरु राहिली. अधुन-मधून हलक्‍या सरी झाल्या. कवठेमहांकाळ, मिरज, पलूस, कडेगाव, तासगाव, जत तालुक्‍यात पावसाचा जोर कमी होता. दरम्यान, पावसाचा जोर वाढल्यास धरणातील विसर्ग आणखी वाढवण्यात येणार आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहावे असा इशारा प्रशासनाने दिला आहे. 

जिल्ह्यात सरासरी 8.91 मिलीमीटर पाऊस 
जिल्ह्यात गेल्या 24 तासात 9.91 मिलिमिटर पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्‍यात सर्वाधिक 45.5 मिलिमिटर पाऊस झाला. तालुकानिहाय आजचा व आजअखेरचा पाऊस असा- मिरज 6.5 (307.6), तासगाव 3.4 (290), कवठेमहांकाळ 2.3 (358), वाळवा-इस्लामपूर 9.5 (340.3), शिराळा 45.5 (766.4), कडेगाव 7.6 (294.8), पलूस 1.0 (245.4), खानापूर-विटा 4.0 (399.4), आटपाडी 0.0 (253.0), जत 2.4 (207.2). 

कृष्णेची पाणीपातळी- 
नद्यांची पाणीपातळी पुढीप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड 11.6, बहे 7.6, ताकारी 20, भिलवडी 21.6, आयर्विन सांगली 23, अंकली 29.6 आणि म्हैसाळ बंधारा 39.3 फूट. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Krishna's level decreased, Warne continued to increase . Rain fell heavily in Koyna watershed