esakal | कुडची, हिरेबागेवाडी 'रेड झोन' घोषित :सर्वाधिक रुग्ण कुडचीत....
sakal

बोलून बातमी शोधा

Kudachi Hirebagawadi declared Red Zone belgaum marathi news

रायबाग तालुका कुडची आणि बेळगाव तालुका हिरेबागेवाडी येथे कोरोना संसर्ग रुग्णांची सर्वाधिक नोंद झाली आहे.

कुडची, हिरेबागेवाडी 'रेड झोन' घोषित :सर्वाधिक रुग्ण कुडचीत....

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : रायबाग तालुका कुडची आणि बेळगाव तालुका हिरेबागेवाडी येथे कोरोना संसर्ग रुग्णांची सर्वाधिक नोंद झाली आहे. यासाठी या गावांना "रेड झोन' म्हणून घोषित केले आहे. उर्वरित भागात कमी बाधित आहेत. त्यासाठी उर्वरित परिसरांना निर्बंधीत क्षेत्र (कन्टॅमेट झोन) म्हणून घोषित केले आहे. 

कोरोना संसर्गमध्ये बेळगाव जिल्हा राज्यात तिसरा आहे. जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण 17 कुडची आणि त्यापाठोपाठ हिरेबागेवाडीत (14) आढळले आहेत. दोन्ही मिळून 32 रुग्ण संख्या आहे. बेळगावात कॅम्प परिसरात 6 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. पण, त्यापैकी दोघे कॅम्पत्तर भागामध्ये राहतात.

हेही वाचा- कर्नाटकात 5 पॉझिटिव्ह ; दोघांचा बळी; बाधितांची संख्या झाली एवढी


जिल्ह्यात 42 रुग्ण 

अमननगर, आझमनगरला (एपीएमसी पोलिस ठाणे कार्यक्षेत्र) वास्तव्य आहे. त्यासाठी त्या भागात प्रवेश बंदी आहे. कॅम्प परिसरात अगोदरच निर्बंध आहे. जिल्हाधिकारी एस. बी. बोम्मनहळ्ळी यांनी परिसर सीलचे आदेश बजावले आहेत. कडक कार्यवाही केली जात आहे. जिल्ह्यात 42 कोरोना पॉझिटिव्ह आहेत. हिरेबागेवाडीत 80 वर्षिय वृध्देचा मृत्यू झाला. बेळगुंदी येथील वृध्द बरा झाल्याने घरी सोडले. कोरोना कक्षामध्ये संसर्ग विरोधात प्रत्यक्षात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 40 आहे. 

हेही वाचा- येथे.. पिवळ्या ठिपक्‍या  कवड्या सापाचे अस्तित्व ​
कोरोना संसर्ग रुग्ण 
कुडची - 17 
हिरेबागेवाडी -15 
कॅम्प (अमननगर, आझमनगर) -6 
बेळगुंदी - 1 
पीरणवाडी - 1 
संकेश्‍वर - 1 
येळ्ळूर -1 

एकूण : 42

loading image