Sangli : पोलिसांची धडक कारवाई, 1 कोटीची लाच मागणारा बडतर्फ पोलिस नाईक अखेर जाळ्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kupwad bribe case

आज त्याला कुपवाड पोलिसांनी सकाळी मिरज येथे अटक केली.

पोलिसांची धडक कारवाई, 1 कोटीची लाच मागणारा बडतर्फ पोलिस नाईक अखेर जाळ्यात

कुपवाड : एका शेतकर्‍याकडे एक कोटी रुपयाची लाच मागून राज्यभर चर्चेत आलेल्या कोल्हापूर पोलिस दलातील बडतर्फ पोलिस शिपाई जॉन विलास तिवडे (वय 40, रा. कोरोची ता.हातकणंगले) याला कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी आज सकाळी मिरज येथे अटक केली.

हेही वाचा: Whatsapp : प्रेयसीचं चॅट पाहून डोकं भडकलं, प्रेम विसरून भररस्त्यात केली तिची धुलाई

पुणे जिल्ह्यातील देहूरोड येथील शेतकऱ्याकडे एक कोटी रुपये लाचेची मागणी केल्यामुळे तिवडे हा राज्यभर चर्चेत आला होता. पोलिस दलात या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. आज त्याला कुपवाड पोलिसांनी आज सकाळी मिरज येथे अटक केली.

बडतर्फ तिवडे याच्याविरुद्ध सप्टेंबर 2020 मध्ये नात्यातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन अत्याचार केल्याप्रकरणी कुपवाडला गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात तो दोन वर्षापासून फरार होता. कुपवाडचे पोलिस निरीक्षक अविनाश पाटील आणि त्यांचे पथक तिवडे यांच्या मार्गावर होते. आज तो मिरज येथे आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला अटक केली. कुपवाडच्या गुन्ह्यात त्याला अटक केली आहे.

हेही वाचा: Kolhapur Rain Update : पाहा दिवसभर काय घडलं कोल्हापुरात?

Web Title: Kupwad Bribe Case Police Arrested One Police To Bribe Of Rupees 1 Crore

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..