Kupwad murder case Farid Sheikh latest update
esakal
कुपवाड (जि. सांगली) : विघ्नहर्ता कॉलनीतील मनीषा मोहन केसरेकर (वय ३५) खूनप्रकरणातील संशयित फरिद अब्दुल शेख (वय ५२) याचा मूळ स्वभाव रागीट आणि आक्रमक असल्याची माहिती पोलिसांकडून समोर आली आहे. यापूर्वी २००८ मध्ये घरगुती वादातून त्याने स्वतःच्या मुलावर चाकूने वार केले होते. यानंतर समजवून देखील स्वतःच्या मेहुण्याला जबरी मारहाण केल्याची पोलिसांत नोंद आहे.