Suspect Farid Sheikh Arrested in Sangli Double Murder Case
esakal
कुपवाड : विघ्नहर्ता कॉलनी परिसरात कचरा टाकण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान दुहेरी हत्याकांडात (Kupwad Sangli double murder news) झाले. पती-पत्नीवर हातोडी व चाकूने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात मनीषा मोहन केसरेकर (वय ३५) यांच्यानंतर त्यांचे पती मोहन नागाप्पा केसरेकर (वय ४५) यांचाही मंगळवारी (ता. १८) मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे कुपवाडसह जिल्हा हादरला असून परिसरामध्ये शोककळा पसरली आहे. घटनेबाबत हल्लेखोराविरुद्ध नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.