
कुपवाड तलाठी कार्यालयाच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. वर्षानुवर्षे दस्तांच्या प्रलंबित नोंदी पाहता या गैरकरभरा विरोधात कुपवाड भारतीय जनता पार्टीच्या वतीने जनांदोलनाचा इशारा देण्यात आला. या बाबत अप्पर तहसीलदार अर्चना पाटील यांना निवेदन सादर केले.
कुपवाड : कुपवाड तलाठी कार्यालयाच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. वर्षानुवर्षे दस्तांच्या प्रलंबित नोंदी पाहता या गैरकरभरा विरोधात कुपवाड भारतीय जनता पार्टीच्या वतीने जनांदोलनाचा इशारा देण्यात आला. या बाबत अप्पर तहसीलदार अर्चना पाटील यांना निवेदन सादर केले.
तलाठी कार्यालयात तलाठीच उपस्थित नसल्याने येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे. सातबारा नोंदीसाठी त्यांना चावडीत खेटे मारावे लागतात. कोतवाल आणि कर्मचारी यांच्याकडे विचारणा केली असता नागरिकांना उद्धट उत्तरे मिळत आहेत. महिला-वयोवृद्ध नागरिकांची कर्मचारी दखल घेत नाहीत. या गैरकरभराची तहसील प्रशासनाने दखल घ्यावी, अशा मागणीसाठी अप्पर तहसीलदार अर्चना पाटील यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले. प्रसंगी कुपवाड तलाठी कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. शहराध्यक्ष रवींद्र सदामते म्हणाले,""तलाठी कार्यालयामध्ये एजंटांचा सुळसुळाट निर्माण झाला आहे. एजंटा बरोबरील आर्थिक तडजोडी मार्फत त्वरित नोंदी घातल्या जातात.
गेली अनेक वर्षांपासून गोरगरीब नागरिकांच्या असंख्य नोंदी प्रलंबित आहेत. कुपवाडात नुकतीच नेमणूक झालेले तलाठी कार्यालयात वेळेवर हजर नसतात. सतत खोटी करणे सांगून ते कार्यालया बाहेर असतात.''
पुढे ते म्हणाले,""शहरातील विद्यार्थ्यांचे दाखले वेळेवर दिले जात नाहीत. याबाबत तलाठ्यांशी संपर्क साधला असता तो होत नाही. कर्मचाऱ्यांचे गोरगरिबांना उद्धट बोलणे, वृद्ध व महिलांना तासनतास ताटकळत थांबविणे असे प्रकार सतत घडत आहेत. सुधारणा झाली नसल्यास येत्या आठ दिवसांत भाजपच्या वतीने तलाठी कार्यालयास टाळे ठोको आंदोलन करण्यात येईल. यावेळी माजी उपमहापौर धीरज सूर्यवंशी, नगरसेवक संजय कुलकर्णी, विनायक सिंहासने, किरण भोसले, आशरफ वांकर आदी सर्वजण उपस्थित होते.
संपादन : प्रफुल्ल सुतार