Kurundwad Demands Action: Remove Silt and Obstacles, Stop Almatti ExpansionSakal
पश्चिम महाराष्ट्र
Sangli News : कुरुंदवाड पूर परिषदेत ठराव! 'आलमट्टीच्या उंचीवाढीला विरोध तीव्र करा'; नदीपात्रातील गाळासह अडथळे दूर हाेणार
Kurundwad Demands Action: सरकारच्या विविध विभागांमध्ये धरण व्यवस्थापनासंदर्भात सुसंगत समन्वय असणे अत्यावश्यक आहे. महापुराबाबत अनेक तज्ज्ञ, संघटना दीर्घ अभ्यास करत आहेत. त्यांच्या शास्त्रीय अभ्यासावर आधारित धोरण तयार केल्यास महापूर नियंत्रण अधिक प्रभावी होऊ शकते.
कुरुंदवाड : कोल्हापूर, सांगलीमध्ये सतत येणाऱ्या महापुराला आलमट्टी धरण व हिप्परगी बंधाराच कारणीभूत आहे. त्यामुळे ‘आलमट्टी’च्या उंचीवाढीला विरोध असून राज्य सरकारने उंची वाढीला सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर विरोध करावा. जागतिक बँकेकडून मिळालेल्या ३२०० कोटींतून नदीपात्रातील भराव, पूल अडथळे काढण्याची कामे प्राधान्याने करावीत यांसह विविध ठराव आज येथे झालेल्या पूर परिषदेत करण्यात आले.