
Sangli District Bank Gardi Branch : सांगली जिल्हा बॅँकेच्या गार्डी (ता. खानापूर) येथील शाखेत शासकीय अनुदान व व्याजामध्ये तब्बल ३० लाख रुपयांचा अपहार झाल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी शाखाधिकारी रघुनाथ धोंडिराम यादव यांना निलंबित करण्यात आले आहे. या अपहारात शाखेतीलच सेवानिवृत्त कर्मचारी धनराज रामचंद्र निकम यांचाही सहभाग असल्याचे उघड झाले आहे. या दोघांची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी सुरू असून, त्याचा अहवाल आल्यानंतर दोघांवरही फौजदारी कारवाई करणार आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी दिली.