सोलापूर विकासाच्या "सेतू'साठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू 

bridge
bridge

सोलापूर : गेल्या आठ ते दहा वर्षांपासून चर्चेत असलेल्या सोलापुरातील उड्डाणपुलांसाठी भूसंपादनाची प्रक्रिया नगररचना संचालक विभागाने सुरू केली आहे. सेक्‍शन एकमधील जुने पुणे नाका ते विजयपूर रस्त्यापर्यंतच्या 350 मिळकतींचा सातबारा तयार झाला आहे. बहुतांश मिळकतदारांनी टीडीआर किंवा एफएसआयऐवजी रोखीने भरपाई देण्याची मागणी केली आहे. 

वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मदत करून ट्रॅफिक कंट्रोल सिस्टिमला सुलभ करण्यास उड्डाणपुलांची मदत होते. वाहतूक कोंडी समस्या टाळण्यासाठी उड्डाणपूल बांधकामाचा परिणाम म्हणून वाहतूक विघटन, वेळ वाचविणे आणि इंधन बचतीचे मूल्यांकन केले जाते. असे आढळून आले की एकूण 35 टक्के वाहतूक फ्लायओव्हरकडे वळविली जाते, ज्यामुळे एकूण उत्सर्जन उत्पादनात 32 टक्के घट होते. फ्लायओव्हरवर प्रवास करून वेळ वाचविण्याचे तंत्रज्ञान आहे, असे या क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे. या पार्श्‍वभूमीवर सोलापुरातील दोन उड्डाणपूल उभारणीच्या कामाला वेग आला आहे. सेक्‍शन दोनमधील जागांचे सातबारा तयार करण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. 

महापालिकेच्या यादीनुसार बाधित होणाऱ्या मिळकती
जुना पुणे नाका ते विजयपूर रस्ता : नवीन बसस्थानक, सिद्धेश्‍वर हॉस्पिटल, पडवळकर वर्कशॉप, सायली रेस्टॉरंट, शिवसंतोषी हॉस्पिटल, दिव्यत्व लॉजिंग, भागवत रेसिडेंटल कॉम्प्लेक्‍स, हॉटेल शिवदत्ता, वैष्णवी हॉटेल, जुन्या दोन चाळी, अजंठा हॉटेल कॉर्नर, वृंदावन लॉज, जैन मंदिर, आहेरकर बजाज, संभाजीराव शिंदे हायस्कूल, पापय्या तालीम, तात्पुरती घरे, उमानगरी कमर्शिअल कॉम्प्लेक्‍स, नरसिंग गिरजी मिल, अण्णा भाऊ साठे पुतळा परिसर, डॉ. कोटणीस चायनीज लर्निंग क्‍लासेस, रेल्वे कॉलनी, दर्गा, तात्पुरती बांधकामे, शनी मंदिर, रेल्वे क्वार्टर्स, महापालिका व्यापारी संकुल, काडादी चाळ, विजयालक्ष्मी ऑर्केड, शिवराम लॉज, एक्‍साईज, मंडी मार्केट, इंडियन ऑइल पेट्रोल पंप, पीडब्ल्यूडी, शासकीय दूध डेअरीच्या मागील बाजू, महसूल भवनची मागची बाजू, हॉटेल प्रथम, शासकीय दूध डेअरी, महसूल भवनची समोरील बाजू, कुमार करजगी टॉवर्स. 

हैदराबाद रस्ता ते विजयपूर रस्ता ते बोरामणी चौक ः सोना अपार्टमेंट, तात्पुरती उभारलेली दुकाने, टिंबर मार्केटमधील अतिक्रमण, भावे ऍटोमोबाईल्स, मतीन सेल्स कार्पोरेशन, न्यू कमर्शिअल कॉम्प्लेक्‍स, मार्केट यार्ड, इंडियन ऑइल पेट्रोल पंप, पद्मा टेक्‍स्टाईल, चव्हाण हिरो, गांगजी टेक्‍स्टाईल, जी प्लस वन बंगलोज अँड एक्‍स्टेंशन फॉर शॉप्स, कुचन हायस्कूल, ओल्ड वेअर हाउस अँड लोखंडवाला वेट ब्रीज, बंगलो अँड एक्‍स्टेंशन, श्रीराम बंगलोज, पॉलिटेक्‍निकच्या समोरील बाजू, वालचंद महाविद्यालय, खुली जागा, महालक्ष्मी मंदिर, मार्कंडेय उद्यान, साई स्वीट्‌स, लिंब्रा कलेक्‍शन, कार्तिक ग्रीन शॉप, ए चिप्पा ज्वेलर्स, संपदा ज्वेलर्स, व्यंकटेश ज्वेलर्स, सॅमसंग स्मार्ट कॅफे, गेंट्याल हाउस, हिमालया फर्निचर अँड आरोग्य वैदिक क्‍लिनिक, सरस हॉटेल, अपार्टमेंट, तात्पुरते बांधकाम, नवीन बसस्थानक, सिटी स्पोर्टस स्टेडियम, जी प्लस वन आरसीसी बिल्डिंग, साधू वास्वानी उद्यान, खासगी बंगले, सिप अँड बाईट्‌स, लॅण्डमार्क कॉम्प्लेक्‍स. 

संपादित करावयाच्या मिळकतींचा सातबारा तयार केला जात आहे. बाधित मिळकतदारांना भरपाई देण्यासाठी 329 कोटी रुपयांची गरज भासणार आहे. त्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. बाधित मिळकतदारांनी एफएसआय किंवा टीडीआर घेण्यास नकार दिला आहे. 
- लक्ष्मण चलवादी, सहायक संचालक, नगररचना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com