काय सांगता ! जमीन मोजणी फक्त अर्ध्या तासात; कशामुळे शक्य ?

Land Measurement Possible With Half An Hour Sangli Marathi News
Land Measurement Possible With Half An Hour Sangli Marathi News
Updated on

लेंगरे ( सांगली ) - जमिनीच्या मोजणीअभावी अनेक शेतकऱ्यांचे वाद चव्हाट्यावर आले आहेत. मोजणीसाठी पैसे भरूनही वेळेत मोजणी होत नसल्याने शेतकरी चांगलेच मेटाकुटीला आले आहेत. मोजणी आल्यानंतरही अलीकडे, पलीकडे सरासरीमुळे भाऊबंदकीचे वाद वाढीस लागले होते. शेतकऱ्याचा हा त्रास कमी करण्यासाठी भूमिअभिलेख विभागाने आधुनिक तंत्राचा वापर करत जीपीएसच्या सहाय्याने मोजणी करण्याचा निर्णय घेतल्याने आता काही तासांतच अचूक मोजणी होणार आहे. शेतकऱ्याचा वेळ आणि पैशाची बचत होणार आहे.

जमीन मोजणीसाठी जीपीएस रीडिंग घेण्याचा वेळ कमी करण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने सर्व्हे ऑफ इंडियाच्या मदतीने ‘कॉर्स’ (कंटिन्यूस ऑपरेशन रेफरन्स स्टेशन) उभारण्याचा निर्णय घेतला आहे. आता केवळ अर्ध्या तासात मोजणी शक्‍य होणार आहे.

सध्याच्या तंत्रज्ञानुसार मोजणीस लागतात एक ते चार तास 

सध्या पाच एकर क्षेत्र मोजण्यासाठी एक दिवस लागतो. ‘कॉर्स’ मुळे हे काम अर्ध्या तासात होणार आहे. ईटीएस मशीनच्या सहाय्याने मोजणीचाही पर्याय उपलब्ध आहे. संबंधित जागेवर जीपीएस रीडिंग घेऊन त्या क्षेत्राचे अक्षांश व रेखांश घेतले जातात. या अक्षांश व रेखांशाच्या आधारे मोजणी करणे सोयीचे ठरते. मात्र, सध्याच्या तंत्रज्ञानानुसार अचूक जीपीएस रीडिंग घेण्यासाठी किमान एक ते चार तास लागतात.

‘कॉर्स’ आधारे जीपीएस रीडिंग फक्त ३० मिनिटांत

जीपीएस रीडिंग घेण्यासाठीचा हा वेळ कमी करण्यासाठी भूमिअभिलेख विभागाने सर्वे ऑफ इंडियाच्या मदतीने ‘कॉर्स’ या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येणार आहे. ‘कॉर्स’ आधारे जीपीएस रीडिंग फक्त ३० मिनिटांत घेता येणार आहे. यासाठी ‘कॉर्स’ स्टेशनचे जाळे उभारले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात काही हे स्टेशन उभारण्यासाठी जागा निश्‍चित करण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी सर्व जीपीएस यंत्रणेसाठी उपयुक्त ठिकाणांची पाहणी करण्याचे काय यंत्रणेकडून सुरु करण्यात आले. त्यासाठी संबंधित विभागाकडून लेंगरेसह घाटमाथा परिसरातील बलवडी (खा), करंजे येथील जागेची पाहणी करण्यात आली. त्याचा उपयोग राज्य शासनाबरोबरच सर्व्हे ऑफ इंडियाला देशाचा नकाशा तयार करण्यासाठी होणार आहे.

बनवेगिरीला आळा 

‘‘एक ‘कॉर्स’ स्टेशन भोवतीच्या ६० किलोमीटरच्या त्रिजेच्या क्षेत्रात जीपीएस रीडिंग देणार आहे. घरबसल्या जमिनीची अचूक माहिती मिळणार आहे. एका जमिनीची अनेकांना विक्री करणे, एका ठिकाणची दाखवून दुसऱ्या जमीन विक्रीस आळा बसणार आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com