भूवापर प्रमाणपत्र, नकाशे मिळणार तीन दिवसांत...

Land Use Certificate, CDP Map and Land Map will be available in three days belgum news
Land Use Certificate, CDP Map and Land Map will be available in three days belgum news
Updated on

बेळगाव - भूवापर प्रमाणपत्र (लॅंड यूज सर्टिफिकेट), सीडीपी नकाशा व भूखंड नकाशा मिळविण्यासाठी यापुढे लोकांना बुडा कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागणार नाहीत. ही प्रमाणपत्रे व नकाशे केवळ तीन दिवसांत दिले जातील. बुडाचे नगररचना अधिकारी ए. एस. कांबळे यांच्या संकल्पनेतून ही योजना राबविण्यात येत आहे. याबाबतचा अधिकृत आदेश बुडा आयुक्त प्रीतम नसलापुरे यांनी बजावला आहे.

बुडाची नवी योजना; थेट नगररचना विभागाकडे अर्ज करता येणार

शहर व सभोवतालची २७ गावे बुडाच्या कार्यक्षेत्रात येतात. त्यामुळे, शहर व या गावांचा मास्टरप्लॅन (सीडीपी) बुडाकडून तयार केला जातो. तेथील भूवापर या मास्टरप्लॅनमध्ये बुडाकडून निश्‍चित केला जात असल्याने भूवापर प्रमाणपत्रही बुडाकडूनच दिले जाते. आधी या प्रमाणपत्रासाठी बुडाच्या आवक-जावक 
विभागाकडे अर्ज दाखल करावा लागत होता. तेथून ते अर्ज आयुक्तांकडे पाठविले जात होते. आयुक्तांकडून ते अर्ज नगररचना विभागाकडे पाठविले जात होते.

वेळेची बचत होणार

या सर्व प्रक्रियेला विलंब होत होता. त्यामुळे अर्जदारांना प्रमाणपत्र निर्धारीत वेळेत मिळत नव्हते. मास्टरप्लॅन म्हणजे सीडीपी नकाशा व बुडाच्या निवासी योजनांमधील भूखंडांच्या नकाशांना मोठी मागणी असते. सीडीपी नकाशाला सर्वाधिक अर्ज दाखल होतात. या नकाशांसाठीही आधी आवक-जावक विभागाकडे अर्ज दाखल करावे लागत होते. पण, आता त्यासाठीची पद्धत बदलली आहे.
कांबळे नगररचना अधिकारी म्हणून रुजू होण्यापूर्वी बुडा कार्यालयात ही सुविधा नव्हती. त्यामुळे, अर्जदारांना प्रमाणपत्र व नकाशांसाठी सातत्याने पाठपुरावा करावा लागत होता. ही बाब लक्षात येताच कांबळे यांनी आयुक्त नसलापुरे यांच्याशी चर्चा करुन अर्ज दाखल करण्याची पद्धत बदलण्याची गरज व्यक्त केली. आयुक्तांनीही त्याला मंजुरी देऊन आदेश बजावला. त्यामुळे आता थेट नगररचना विभागाकडे अर्ज देऊन प्रमाणपत्र व नकाशा मिळवता येणार आहे.

हे करावे लागेल

भूवापर प्रमाणपत्र तसेच दोन्ही प्रकारच्या नकाशांसाठी थेट नगररचना विभागाकडे अर्ज दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. शिवाय अर्ज दाखल होताच तीन दिवसांत प्रमाणपत्र व नकाशे संबंधितांना उपलब्ध करून दिले जातील. त्यामुळे योग्य माहितीसह आवश्‍यक ती कागदपत्रे जोडून व निर्धारित शुल्क भरुन अर्ज केला तर तीन दिवसांतच प्रमाणपत्र व नकाशा मिळेल.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Miraj Government Hospital Accident
Sangli Ganesh Visarjan
Who is Yuvraj Adityaraje Patwardhan?
Vasumbe Road Accident Father And Son Killed In Two Wheeler Crash Mother Seriously Injured After Tempo Collision
Marathi News Esakal
www.esakal.com