esakal | साताऱ्यातील ऐतिहासिक राजमार्गावर दरड कोसळली; कास रस्ता बंद
sakal

बोलून बातमी शोधा

landslide

महाबळेश्वर मार्गे मेढा, सातारा कडे येण्यासाठी रस्ता असला तरी गाळदेव गावच्या पुढे वनविभागाच्या अडमुठे पनामुळे हा रस्ताच डांबरी होण्यापासून राहिला आहे. या दिडशे मीटरच्या कच्च्या कामामुळे तेथून गाडी नेने मुश्किल झाले आहे.  पूर्ण राजमार्ग डांबरी झाला असताना या छोट्याशा पट्ट्यामुळे राजमार्गाचा पूर्ण वापर होत नाही. 

साताऱ्यातील ऐतिहासिक राजमार्गावर दरड कोसळली; कास रस्ता बंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कास : गेल्या अनेक वर्षांत पडला नाही असा पाऊस जावळी तालुक्यात कोसळत असून सोमवारी तर पावसाने रेकॉर्ड मोडले. या मुसळधार पावसाने कास, बामणोली तसेच सह्याद्रीच्या माथ्यावरील गावातील रस्त्यांवर दरडी कोसळण्याचे सत्र चालूच असून आज रात्री ऐतिहासिक राजमार्गावर पाटणेमाची गावच्या बोर्डाजवळ मोठी दरड कोसळून हा रस्ता बंद झाला आहे. दरडीचा भराव एवढा मोठा आहे की येथून पायी जाण्यासाठी ही छोटीशी वाट राहिलेली नाही. 

हा रस्ता बंद झाल्याने दरडीच्या महाबळेश्वर बाजूकडील पाटणेमाची, मांटी, मांटीमुरा, तेटलीमुरा, निपाणीमुरा, म्हातेमुरा, गाळदेव, वारसोळी कोळी, ढेबेवस्ती या गावांसह छोट्या वस्त्यांचा मेढ्याशी असलेला संपर्क तुटला आहे. 

महाबळेश्वर मार्गे मेढा, सातारा कडे येण्यासाठी रस्ता असला तरी गाळदेव गावच्या पुढे वनविभागाच्या अडमुठे पनामुळे हा रस्ताच डांबरी होण्यापासून राहिला आहे. या दिडशे मीटरच्या कच्च्या कामामुळे तेथून गाडी नेने मुश्किल झाले आहे.  पूर्ण राजमार्ग डांबरी झाला असताना या छोट्याशा पट्ट्यामुळे राजमार्गाचा पूर्ण वापर होत नाही. 

सह्याद्रीच्या माथ्यावरील या गावात पशूपालन हा मुख्य व्यवसाय असून सकाळी साताराकडे लोकांचे दूध संकलन करून येणाऱ्या गाड्या अलिकडेच अडकल्या आहेत. तर येथून पुढील सह्याद्रीनगर, चिकनवाडी, कुसुंबीमुरा या गावातील दूध संकलन ही याच गाड्या करत असल्याने येथील शेतकर्यांचेही दूध आज घरीच राहणार आहे. 

दहा ते पंधरा गावांचा दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाल्याने सदर दरड तात्काळ हलवण्याच्या कामास प्रशासननाने सुरूवात करावी अशी मागणी लोकांमधून होत आहे. 

loading image