इंगळगावमध्ये 21 वर्षीय युवकाचा खून; मृतदेह विहिरीत फेकला... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

murder case
इंगळगावमध्ये 21 वर्षीय युवकाचा खून; मृतदेह विहिरीत फेकला...

इंगळगावमध्ये 21 वर्षीय युवकाचा खून; मृतदेह विहिरीत फेकला...

अथणी : एका 21 वर्षीय युवकाचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी‌ मृतदेह विहिरीत फेकण्यात आला. अग्रणी इंगळगाव (ता. अथणी) येथे गुरुवारी (ता. ५) ही घटना उघडकीस आली. मृत युवक अरुण संजय माशाळे हा अथणी तालुक्यातील खोतनहट्टी गावचा आहे. याबाबत अथणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सविस्तर समजलेली माहिती अशी, मत अरुण माशाळे यांच्या आईचे माहेर अग्रणी इंगळगाव आहे.

तो येथे बुधवारी (ता. ४) आला होता. मित्राच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला जातो, असे सांगून तो घरातून बाहेर पडला होता. गुरुवारी सकाळी गावातील गावंधरी विहिरीच्या बाजूस त्याचे चप्पल व मोटार सायकल आढळून आली. घाबरून ग्रामस्थांनी याविषयी तात्काळ अथणी पोलिस ठाण्याला माहिती दिली. पोलिसांनी वेळीच अग्निशामक दलाच्या पथकासह धाव घेऊन विहिरीत पाहणी केल्यानंतर त्याचा मृतदेह आढळून आला. त्याच्या शरीरावर धारधार शस्त्राने आडवेतिडवे वार करून त्याचा खून करून टाकल्याचे निदर्शनास आले. खुनाच्या मागील नेमके कारण समजू शकले नाही. अथणी पोलिस याबाबत कसून चौकशी करीत आहेत.

Web Title: Latest Crime News 21 Year Old Murdered In Ingalgaon Body Was Thrown Into Well

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top