पालकांचे हेलपाटे ''यामुळे'' हाेणार आता बंद ....

Kolhapur News
Kolhapur News

कोल्हापूर : अध्ययन अक्षमता, लर्निंग डिसॲबिलिटी, डिस्लेक्‍सिया, हे शब्द जरी जड असले तरी अमीर खानच्या ‘तारे जमीं पर’ चित्रपटातील ‘इशान’ आठवला, की त्याचा अर्थ लगेचच उमजतो. घराघरांतील असेच ‘इशान’ शोधण्यासाठी सुरू झालेल्या शोधमोहिमेतून जिल्ह्यातील २० विद्यार्थ्यांना अध्ययन अक्षम असल्याचे दाखले दिले आहेत. आठ विद्यार्थ्यांच्या दाखल्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

दरम्यान, अध्ययन अक्षम आणि स्वमग्न मुलांच्या तपासणीसाठी यापूर्वी पुणे किंवा मुंबईला जावे लागत होते मात्र, आता ही सुविधा कोल्हापूर आणि सांगलीतही उपलब्ध झाली आहे. दोन्ही जिल्ह्यांतील संभाव्य यादी मोठी असली तरी ही शोधमोहीम गतीने सुरू आहे.

संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असली तरी त्याची माहिती संबंधित केंद्रात दिली जाते.अध्ययन अक्षमता असलेल्या मुलांत कोणतेही शारीरिक, मानसिक, भावनिक किंवा बौद्धिक व्यंग नसते. त्यांचा बुद्ध्यांक चांगला असला तरी अभ्यासात ही मुले मागे राहतात;

अध्ययन अक्षम मुलांचे प्रमाण किमान १० टक्के आहे.

मात्र ही मुलं म्हणजे विशेष मुलं नव्हेत. अध्ययन अक्षम मुलांचे प्रमाण किमान १० टक्के आहे. वाचन, लेखन, गणित, शुद्धलेखन, व्याकरण अशा विविध गोष्टी आत्मसात करता न येणं, हे त्यांचे प्रमुख लक्षण आहे.

अध्ययन अक्षमता समस्येचे निदान करण्यासाठी कोणतीच चाचणी नसल्याचे लक्षात आल्यानंतर राष्ट्रीय मेंदू संशोधन संस्थेने २०१३ साली पाच संस्थांची निवड केली. या पाच संस्थांनी ‘डीएएलआय’ अर्थात ‘डिस्लेक्‍सिया ॲसेसमेंट ऑफ लॅंग्वेजीस इन इंडिया’ ही भारतीय भाषांत निदान करणारी चाचणी विकसित केली आहे, त्याचा फायदा या शोध मोहिमेसाठी होत आहे. 

हेही वाचा -कोल्हापूरातील तरुण का चालले या वाटेने...?
  
सीपीआरमध्ये सुविधा, ही कागदपत्रे हवीत
कोल्हापुरात ‘सीपीआर’ मधील मानसोपचार विभागात तपासणीची सुविधा असून त्यासाठी संबंधित शाळेचे मूळ पत्र, पाल्याचे तीन पासपोर्ट साईज फोटो, मानसोपचार ओपीडी केसपेपर, जुने रिपोर्ट व काही आजार असल्यास त्याचे रिपोर्टस्‌, जन्म दाखल्याची झेरॉक्‍स, पाल्याचे ओळखपत्र, पालकांचे ओळखपत्र आणि शाळेतील मागील तीन वर्षांच्या वार्षिक गुणपत्रिकेच्या झेरॉक्‍स ही कागदपत्रे सादर करावी लागतात.  

शिक्षणासाठी स्वतंत्र दाखले 
अध्ययन अक्षम असोत किंवा स्वमग्न मुलांसाठी विविध उपचारात्मक शिक्षण पद्धती अधिक उपयुक्त ठरतात. पण, त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने विशेष सवलतीही दिल्या आहेत.

त्याशिवाय प्रवास, वैद्यकीय सुविधा आदी सवलतींचा लाभही त्यांना घेता येतो. त्याबाबतही मोठ्या प्रमाणावर जनजागृती सुरू आहे. 

२८ विद्यार्थ्यांना दाखले मिळाले

सांगलीत अध्ययन अक्षम असणाऱ्या २८ विद्यार्थ्यांना दाखले दिले आहेत. ही प्रक्रिया अधिक गतीने होण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी निधीही उपलब्ध झाला आहे. 
- डॉ. राजकिरण साळुंखे, सांगली

तपासणीच्या सुविधा उपलब्ध
सीपीआर’मध्ये मानसोपचार विभागात  आहेत. जिल्ह्यातील वीसहून अधिक विद्यार्थ्यांना दाखले दिले असून, अजून आठ जणांनी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.  
- डॉ. पवन खोत, मानसोपचार विभागप्रमुख, सीपीआर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com