भाजप-काँग्रेसमध्येच काँटे की टक्कर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Legislative Council elections bjp congress Election date announced Northwest Graduate and Teachers constituency of Legislative Council belgaum

भाजप-काँग्रेसमध्येच काँटे की टक्कर

बेळगाव : विधान परिषदेच्या वायव्य पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी निवडणुकीची तारीख घोषित झाली आहे. त्यामुळे निवडणुकीचे वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. प्रादेशिक पक्ष, अपक्षांनी निवडणूक आखाड्यात उतरण्याची घोषणा केली आहे. मात्र, भाजप आणि काँग्रेसमध्ये होणार काँटे की टक्कर होणार आहे. त्यादृष्टीने उमेदवारांसह पक्षाकडून मतांची गोळाबेरीज सुरु करण्यात आली असून रणनितीही आखली जात आहे.

वायव्य पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या अखत्यारित बेळगाव, बागलकोट आणि विजापूर जिल्ह्याचा समावेश आहे. वायव्य पदवीधर मतदारसंघासाठी भाजपने विद्यमान सदस्य हणमंत निराणी यांनाच उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसने सुनील संक यांना उमेदवारी जाहीर केली आहे. वायव्य शिक्षक मतदारसंघातून भाजपने पुन्हा विद्यमान सदस्य अरुण शहापूर यांच्यावर विश्र्वास दाखविला आहे. तर काँग्रेसने माजी खासदार प्रकाश हुक्केरी यांना रिंगणात उतरविले आहे. तिन्ही जिल्ह्यांपैकी बेळगाव जिल्ह्यात सर्वाधिक मतदार आहेत. आमदार शहापूर यांनी दोन वेळा विधान परिषद निवडणुकीत विजय मिळविला असून तिसऱ्यांदा ते आपले नशीब आजमावत आहेत. भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे त्यांना पाठबळ आहे. शिवाय विविध संघ, संस्था आणि समाजाने पाठिंबा घोषित केला आहे.

दरम्यान, अलीकडेच बेळगावात सुमारे १ हजार शिक्षकांच्या उपस्थितीत शिक्षकांची बैठक झाली होती. यावेळी बेळगाव जिल्ह्यामधील उमेदवाराला उमेदवारी देण्याची मागणी झालेली आहे. त्याचा कितपत परिणाम जाणवितो, याबाबत उत्सुकता आहे. काँग्रेसचे उमेदवार हुक्केरी हे बेळगाव जिल्ह्यातील असून मंत्री, खासदार म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. जिल्ह्यात त्यांची पकडही आहे. त्यामुळे भाजप उमेदवार शहापूर यांच्यापुढे ते कडवे आव्हान उभे करतील, असे मानले जात आहे. पदवीधर मतदारसंघातील उमेदवार निराणी यांना पक्षाने दुसऱ्यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचे बंधू मंत्री मुरगेश निराणी यांचे पाठबळ त्यांना मिळत आहे. काँग्रेस उमेदवार संक हे केपीसीसीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांचे समर्थक मानले जातात. यामुळे त्यांची साथ निवडणुकीत रंगत आणणारी ठरु शकते.

विधानसभेची रंगीत तालीम

वायव्य पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी १३ जून रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीची दिशा या निवडणुकीमुळे ठरणार आहे. भाजप व काँग्रेस पक्षासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची असणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय पक्षाच्या पातळीवर तसेच स्थानिक कार्यकर्त्यांकडून निवडणुकीची तयारीला सुरुवात करण्यात आली आहे.

मतदान केंद्रांची संख्या अशी

वायव्य शिक्षक मतदारसंघ

मतदान केंद्रे ः १९,५०५

(बेळगाव ९,३५५, विजापूर ५,५१२, बागलकोट ४,६३८)

वायव्य पदवीधर मतदारसंघ

मतदार केंद्र ः ७२,६७४

(बेळगाव ३१,४८९, विजापूर १४,८४६, बागलकोट २६,३४२)

वेळापत्रक असे

  • निवडणुकीची अधिसूचना ः १९ मे

  • उमेदवारी अर्ज दाखल ः २६ मे

अर्जांची छाननी ः २७ मे

  • माघार ः ३० मे

  • मतदान ः १३ जून (सकाळी ८ ते दुपारी ४)

  • मतमोजणी ः १५ जून

Web Title: Legislative Council Elections Bjp Congress Election Date Announced Northwest Graduate And Teachers Constituency Of Legislative Council Belgaum

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top