
आष्टा : येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याच्या नर जातीच्या बछड्याचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री ९.३० च्या सुमारास स्थानिक नागरिकांनी वनविभाग अधिकारी कर्मचाऱ्यांना आष्टा-दुधगाव रस्त्यावर काळ्या ओढ्याजवळ आष्टा हद्दीत बछडा मृतावस्थेत आढळल्याचे सांगितले.