

शिराळा : रेठरे धरण (ता. वाळवा) येथे भक्ष्याचा पाठलाग करत असताना विहिरीत पडून येथे बिबट्याचा मृत्यू झाला. येथील म्हसोबा मंदिरानजीक चाळीस फूट खोल विहिरीत पडून बुडालेला बिबट्या चार वर्षांचा आहे. मादी बिबट्याच्या मृत्यूची घटना आज सकाळी नऊच्या सुमारास उघडकीस आली.