Forest Department leopard rescue operation
esakal
ईश्वरपूर (सांगली) : येथील संभुआप्पा मठ परिसरातील लोकवस्तीत सोमवारी (ता. ६) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास बिबट्या आल्याने एकच खळबळ (Leopard enters residential area in Sangli) उडाली. सुमारे पाच तास अथक प्रयत्न करून वनविभागाच्या पथकाने योग्य संधी साधत त्याला भुलीचे इंजेक्शन दिले. काही वेळाने तो बेशुद्ध झाल्यानंतर सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात आले.