
नेर्ले : काळमवाडी (ता. वाळवा) येथील शेतकरी शंकर भाऊ देसाई यांच्या गावच्या पश्चिम बाजूला असलेल्या शेती गट क्रमांक ८५५ मध्ये दीड वर्षाच्या बिबट्याला वन विभागाने पिंजरा लावून सुरक्षित बाहेर काढले. आज सकाळपासून बिबट्याला बाहेर काढण्यासाठी वन विभागाने प्रयत्न केले. बिबट्या विहिरीत पडल्याची घटना सकाळी साडेआठच्या सुमारास शंकर देसाई यांना निदर्शनास आली. विहिरीतील शेतीपंप सुरू करण्यासाठी गेल्यानंतर त्यांना विहिरीत बिबट्या दिसला. यावेळी त्यांनी पोलिसपाटील यांना कळवून वनविभागाला माहिती दिली.