Forest Officer Team
sakal
सांगली - कांचनपूर (ता. मिरज) गावाच्या पूर्वेस असलेल्या कृषी विज्ञान केंद्र परिसरात बिबट्याचाच वावर असल्याचे आज स्पष्ट झाले. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी रात्री बिबट्याने एका कुत्र्याला फरफटत नेऊन खाण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले. कुत्रा ग्रामस्थांना आज सापडल्याने या परिसरातील नागरिक अधिक सतर्क झाले आहेत.