esakal | काळाबाजार करणाऱ्या खत-औषधे दुकानादारांना धडा शिकवू
sakal

बोलून बातमी शोधा

agr.jpeg

सांगली : काही कृषी खत-औषधे दुकानदार व कंपन्या काळा बाजार करीत असून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केली आहे. तसे न झाल्यास कर्फ्य संपताच अशा दुकानदारानी दुकान जागेवर राहणार नाही हे लक्षात घ्यावे अशा इशाराही त्यांनी दिला आहे.http://https://www.esakal.com/paschim-maharashtra/ayurvedic-clinics-will-continue-two-hours-every-day-273905

काळाबाजार करणाऱ्या खत-औषधे दुकानादारांना धडा शिकवू

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सांगली : काही कृषी खत-औषधे दुकानदार व कंपन्या काळा बाजार करीत असून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केली आहे. तसे न झाल्यास कर्फ्य संपताच अशा दुकानदारानी दुकान जागेवर राहणार नाही हे लक्षात घ्यावे अशा इशाराही त्यांनी दिला आहे.

हे वाचा : आयुर्वेद दवाखाने रोज दोन तास सुरु राहतील

खराडे म्हणाले,`` सांगली जिल्ह्यातील द्राक्ष, ऊस व भाजी पाला उत्पादक शेतकरी संकटात आहे या शेतीमालाची वाहतूक करण्यासाठी प्रशासकीय अडचणी दूर झाल्या आहेत मात्र वाहतूक करणाऱ्या वाहनासाठी डिझेलचा तुटवडा जाणवत आहे. महापूर आणि अतिवृष्टीमुळे द्राक्ष, भाजी पाला, व ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आला या काळात शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात आला यातून बचावलेला शेतकरी कोरोणाच्या कचाट्यात अडकला आहे. दिलासा देणारी भूमिका जिल्हा प्रशासन घेत असले तरी काही व्यावसायिक शेतकऱ्यांची लूट करीत आहेत. त्याचवेळी वाहनांना इंधन मिळत नसल्याने अडचणी वाढल्या आहेत.''

हे वाचा : भटक्‍या कुत्र्यांसाठी धावले प्राणीमित्र

खराडे म्हणाले,`` शेती माल वाहतूक करणाऱ्या वाहनासाठी प्रत्येक तालुक्‍याच्या ठिकाणी एक तसेच तालुक्‍यातील मोठ्या दोन गावातील पंप सुरू ठेवणे गरजेचे आहे. जी वाहने शेतीमाल वाहतूक करतात त्यांना गावातील सरपंच, तलाठी आणि ग्रामसेवक व पोलीस पाटील यांच्या सल्ल्याने कर्फ्यु पास द्यावेत, असे केले तर शेती माल वाहतूक सुरळीत होईल. त्याच बरोबर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात द्राक्ष अद्याप बाकी आहेत. विशेषतः पलूस ,तासगाव जत आणि मिरज तालुक्‍यातील द्राक्षे अद्याप बागेत आहेत. या द्राक्षाचा बेदाणा करण्यासाठी शेतकऱ्याची धडपड सुरू आहे. बेदाणा निर्मिती साठी लागणारे ऑईल आणि कार्बोनेट याचा काळा बाजार सुरू आहे. शेतकऱ्याना खिंडीत पकडणाऱ्यांची कर्फ्य संपताच खैर नाही हे लक्षात घ्यावे. शेतकऱ्याना आणखी अडचणीत आणू नका अन्यथा याचे वाईट परिणाम भोगावे लागतील. काळा बाजार करणाऱ्यावर कृषी विभागाने कारवाई करावीच पण स्वाभिमानी ही गप्प बसणार नाही. शेतकऱ्यांच्या मजबुरीची गैर फायदा घेत असाल तर परिणाम भोगण्यासाठी तयार रहा. ''