

सांगली भाजपमध्ये उपऱ्यांचे इनकमींग, आमदार सुधीर गाडगीळांचा लेटरबॉम्ब
esakal
Sangli Politics : ‘महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये बाहेरचे कार्यकर्ते प्रवेश करत असल्याने जुन्या, निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. मात्र या निष्ठावंतांना न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,’ असा इशारा आमदार सुधीर गाडगीळ यांनी दिला. ‘पालकमंत्र्यांची काहीजणांकडून दिशाभूल केली जात आहे. महापालिका क्षेत्रात सहा माजी नगरसेवकांनी प्रवेश केला असताना २२ तिकिटे कुणाला,’ असा सवालही त्यांनी उपस्थित केला. संयमी सुधीर गाडगीळ यांच्या या लेटरबॉम्बमुळे खळबळ उडाली आहे.