LN Shaha
sakal
ईश्वरपूर (जिल्हा सांगली) - ईश्वरपूर शहराच्या राजकारणात दीर्घ काळापासून माजी मंत्री, विद्यमान आमदार जयंत पाटील यांचे कट्टर विरोधक मानले जाणारे, विकास आघाडीचे ज्येष्ठ सदस्य, माजी नगरसेवक एल. एन. शहा यांनी आज विकास आघाडीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. प्रामाणिकपणा आणि निष्ठेचा अपमान होत असल्याची खंत मनाला खोलवर वेदना देत असल्याचे त्यांनी राजीनाम्यात म्हटले आहे.