

Local leaders addressing voters during the final phase of the Sangli municipal election campaign.
sakal
सांगली : महापालिका निवडणुकीचा शेवटचा टप्पा सुरू झाला आहे. उद्या (ता. १३) जाहीर प्रचाराची सांगता होईल. गेल्या आठ-दहा दिवसांत विविध मुद्यांवर प्रचाराची रणधुमाळी झाली. त्यात स्थानिक नेतेच केंद्रस्थानी राहिले. विकासाचे विविध मुद्दे चर्चेला आले. भाजपने विकासाचा त्रिवेणी संगम मांडला, तर विरोधकांनी गेल्या दहा वर्षांत काय केले, असा सवाल केला.