esakal | मोठी बातमी ! अक्‍कलकोट, मोहोळ, बार्शी, वैरागसह 'या' 26 गावात लॉकडाउन 
sakal

बोलून बातमी शोधा

2lockdown_20solapur.jpg

"या' गावांमध्ये कडक लॉकडाउनचा प्रस्ताव 
दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील बोरामणी, मुळेगाव, मुळेगाव तांडा, बक्षी हिप्परगा, कासेगाव, उळेगाव, विडी घरकूल, कुंभारी, वळसंग, होटगी, लिंबिचिंचोळी, तांदूळवाडी या गावांमध्ये तर अक्‍कलकोट शहर, बार्शी व वैराग शहरात कडक लॉकडाउन केला जाणार आहे. तसेच मोहोळ शहराबरोबरच तालुक्‍यातील कुरुल, कामती खु., कामती बु. आणि उत्तर सोलापूर तालुक्‍यातील तिऱ्हे, पाकणी, कोंडी, बाणेगाव, मार्डी, नान्नज, तळे हिप्परगा, हगलूर, एकरुख, कारंबा व भोगाव या गावांचाही प्रस्तावात समावेश करण्यात आला आहे. 

मोठी बातमी ! अक्‍कलकोट, मोहोळ, बार्शी, वैरागसह 'या' 26 गावात लॉकडाउन 

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : सध्या सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात कोरोना विषाणूमुळे बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. सोलापूर ग्रामीण घटकातील दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्‍कलकोट, मोहोळ, बार्शी या तालुक्‍यांमध्ये कोरोनाच्या संसर्गाची साखळी दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना संसर्गाची वाढत असलेली साखळी खंडीत करण्याच्या उद्देशाने बार्शी, वैराग, मोहोळ, अक्‍कलकोट या शहरासह दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर व मोहोळ तालुक्‍यातील 26 गावांमध्ये कडक लॉकडाउन करणे आवश्‍यक आहे. अशाप्रकारचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. 

शहरातील रुग्णसंख्येने तीन हजारांचा टप्पा ओलांडला असून तीनशेहून अधिक रुग्णांचे कोरोनाने बळी घेतले आहेत. शहरात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतरही जिल्ह्यात कोरोना पोहचला नव्हता. मात्र, लॉकडाउन शिथिल केल्यानंतर जिल्ह्यातील सर्वच तालुक्‍यात रुग्णांची वाढ झाली. आता सोलापूर ग्रामीणमधील रुग्णसंख्या साडेआठशेहून अधिक झाली आहे. तर दुसरीकडे रविवारपर्यंत (ता. 12) मृतांची संख्या 36 झाली होती. तसेच जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्‍यात सर्वाधिक 279 रुग्ण आढळले असून बार्शीत 178, अक्‍कलकोटमध्ये 156, उत्तर सोलापूर तालुक्‍यात 91 तर मोहोळ तालुक्‍यात 45 रुग्ण आढळले आहेत. रुग्ण वाढत असलेल्या गावांमधील तथा शहरांमधील कोरोना संसर्गाची साखळी खंडीत करण्याच्या हेतूने पोलिस अधीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रस्ताव पाठविला आहे. 

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रस्ताव 
अक्‍कलकोट, बार्शी, मोहोळ, वैराग या शहरांबरोबरच जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व मोहोळ तालुक्‍यातील (26 गावे) ज्या गावांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढतोय, अशा ठिकाणी कडक लॉकडाउन करावा, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे दिला आहे. 
-अतुल झेंडे, अप्पर पोलिस अधीक्षक 

loading image