esakal | सांगली जिल्ह्यात लॉकडाऊन; काय सुरु काय बंद, वाचा सविस्तर

बोलून बातमी शोधा

सांगली जिल्ह्यात लॉकडाऊन; काय सुरु काय बंद, वाचा सविस्तर
सांगली जिल्ह्यात लॉकडाऊन; काय सुरु काय बंद, वाचा सविस्तर
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली : जिल्ह्यात (५) पालकमंत्री जयंत पाटील यांनी लॉकडाऊन (Lockdown) जाहीर केले आहे. प्रशासकीय अंमलबजावणीबाबत जिल्हाधिकारी (Orders of Collector) डॉ. अभिजित चौधरी यांनी सांगितले की, लॉकडाऊनमध्ये दूध, औषधे वगळता अत्यावश्यक (Imergency Service) सेवा बंद राहतील. दूध विक्री सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत करता येईल. शिवभोजन थाळीची, रेस्टॉरंटमधून केवळ पार्सल सुविधा मिळेल. आंतरजिल्हा एस. टी., अत्यावश्यक सेवेतील उद्योग, (Industry)शासकीय मालवाहतूक, बँका, (Bank) पेट्रोलपंप, रिक्षा आणि टॅक्सी अत्यावश्यक सेवेसाठी सुरु राहतील. सर्व प्रकारची दुकाने, बेकरी, कृषी सेवा केंद्रे, हॉटेल, बार, वाईन शॉप, कृषी उत्पन्न बाजार समित्या, भाजी, फळे विक्री, मटण, चिकण विक्रीची दुकानेही बंद ठेवली जाणार आहेत. कडक निर्बंधाची अंमलबजावणी करण्याचे आदेश पोलिस प्रशासनाला दिले आहेत.

हे सुरु राहणार

 • दूध विक्री

 • दवाखाने, मेडिकल

 • रेस्टॉरंटमधून होम डिलीव्हरी

 • शिवभोजन थाळी (पार्सल)

 • शासकीय माल वाहतूक

 • बँका

 • पेट्रोल पंप ( अत्यावश्‍यक सेवा)

हेही वाचा: आरक्षण रद्द हा समाजाच्या दृष्टिकोनातून अत्यंत दुर्दैवी प्रसंग : संभाजीराजे

हे बंद राहणार

 • सर्व प्रकारची दुकाने, बेकरी

 • कृषी सेवा केंद्रे

 • हॉटेल, बार, वाईन शॉप

 • कृषी उत्पन्न बाजार समित्या

 • भाजी, फळे विक्री

 • मटण, चिकण विक्री

 • पेट्रोल पंप