esakal | सांगलीतील महामार्ग व सेवा रस्ते झाले शांत.........

बोलून बातमी शोधा

lockdown impact in sangli highway sangli marathi news

कोरोना व्हायरस च्या पार्श्वभूमीवर एक उपनिरीक्षकासह दहा ते बारा पोलिसांचा फौजफाटा सीमारेषेवर तैनात आहे. 

सांगलीतील महामार्ग व सेवा रस्ते झाले शांत.........
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नेर्ले : (सांगली) : पुणे-बंगळूर महामार्गावर सांगली सातारा जिल्ह्याच्या सीमारेषेवर मालखेड फाट्याजवळ पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.कोरोना व्हायरस च्या पार्श्वभूमीवर एक उपनिरीक्षकासह दहा ते बारा पोलिसांचा फौजफाटा सीमारेषेवर तैनात आहे. 

पुणे बंगळूर महामार्गावर वाहनांच्या तपासणीसाठी साताऱ्याहून येणाऱ्या सर्व वाहनांची तपासणी कासेगाव पोलीस सांगली जिल्ह्याच्या सीमारेषेवर करत आहेत. तसेच कोल्हापूर हुन येणाऱ्या व सातारा जिल्ह्यात जाणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात येत आहे एकूणच महामार्गावर अत्यावश्यक सेवा देणाऱ्या सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये प्रवेश मिळत असल्याचे चित्र आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा जोर धरू लागली आहे.

हेही वाचा- Video -व्हिडिओ रेकॉर्डद्वारे पोलिसांकडून गांधीगिरी; प्रतिष्ठित समजणाऱ्यांना चपराक

 अनेक गावांनी दिला प्रतिसाद

सातारा आणि सांगली जिल्ह्याच्या सीमारेषा बंद झाल्यामुळे महामार्ग व सेवा रस्ते शांत झाले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता महामार्गावर  कोणीही फिरकत नसल्याचे चित्र आहे. महामार्गावरील असणाऱ्या अनेक गावांनी यास चांगला प्रतिसाद दिला आहे. महामार्गावर ती कोणीही कामाव्यतिरिक्त येऊ नये अन्यथा त्यांच्यावर ती कारवाई होऊ शकते असा इशारा पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र भुतकर यांनी दिला आहे. तसेच सांगली जिल्ह्यामध्ये येणाऱ्या अनेक वाहनांची तपासणी कासेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या मार्गदर्शन खाली होत असून सांगली जिल्ह्यामध्ये येणाऱ्या  अत्यावश्यक वाहनांनाच प्रवेश दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

निदान एकवेळचे तरी अन्न मिळावे म्हणुन देवरुखकर आले मदतीला...

महामार्ग पडला निपचीत

विनाकारण लोकांनी घराबाहेर पडून महामार्ग वरती येऊ नये त्याचबरोबर त्यांची शेताची कामे आहेत त्यांनी काम उरकल्यानंतर घरी जावे रस्त्यावरती भरकटू नये असे आवाहन श्री वाघ यांनी केले आहे.  दुतर्फा असणारा महामार्ग सध्या ओसाड आणि उनाड बनला आहे. या अगोदर महामार्गावर वाहनांची रेल चेल असायची पण महामार्ग सद्या निपचीत पडला आहे. विनाकारण फिरणाऱ्या दुचाकी धारक व चारचाकी धारक यांच्यावरती पोलीस यंत्रणेचे लक्ष आहे.