Lockdown Impact - असेच ‘बंद-चालू’ सुरू राहिले तर जगणेही अवघड

असेच सुरू राहिले तर जगण्याचा प्रश्न गंभीर‍ होणार आहे
Lockdown Impact - असेच ‘बंद-चालू’ सुरू राहिले तर जगणेही अवघड
Updated on

खरसुंडी : आटपाडी तालुक्याच्या (aatpadi) ग्रामीण भागात तीन महिन्यांनंतर एकच आठवडा व्यवसाय सुरू झाले. पुन्हा शासनाच्या आदेशाने अत्यावश्‍यक वर्गात न मोडणारे व्यवसाय बंद करण्यात आल्याने व्यावसायिकांवर संक्रात आली आहे. असेच सुरू राहिले तर जगण्याचा प्रश्न गंभीर‍ होणार आहे. आटपाडी ग्रामीण भागातील मोठ्या गावांमधील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवसाय मार्च महिन्याच्या पाच तारखेपासून संसर्गाच्या (covid-19) पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशाने बंद ठेवण्यात आले.

जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एकच आठवडा व्यवसाय सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. व्यवसाय सुरू झाले. एकाच आठवड्यानंतर परत शासन आदेश संसर्ग वाढत असल्याने जिल्ह्यात काढण्यात आला. (lockdown) कापड, स्टेशनरी, हॉटेल, पान टपरी व इतरही व्यवसाय बंद झाले. तीन महिन्यानंतर सुरू झालेली व्यवसाय परत बंद झाल्यामुळे व्यावसायिकांवर जगण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. हे असेच चालत राहिले तर व्यवसाय मोडीत निघण्याचा प्रश्न व व्यवसायिक आर्थिक अडचणीत येण्याचा धोका निर्माण झाला आहे.

Lockdown Impact - असेच ‘बंद-चालू’ सुरू राहिले तर जगणेही अवघड
Success Story:दुबईच्या मार्केटमध्ये सांगलीचा ड्रॅगन; पाहा व्हिडिओ

गत वर्ष निम्मे कोरोना संसर्गाच्या महामारीत गेले. याही वर्षी असेच सुरू आहे. शहरी व ग्रामीण भागातील मोठी गावात असणारे व्यावसायिक गावची शान. व्यावसायिक दुकानांमुळेच विकासास प्रोत्साहन मिळते. खरसुंडीसारख्या ग्रामीण भागातील एका तीर्थक्षेत्रामुळे मोठे महत्त्व प्राप्त आले आहे. विविध दुकाने गावची शान. तीर्थक्षेत्रावर अवलंबून असलेले व्यावसायिक आणि मंदिरास येणारे भाविक यामुळे तालुक्यातील या गावास मोठे महत्त्व प्राप्त झाले. गतवर्षी व यावर्षी मंदिर बंद असल्याने सर्वच व्यावसायिकांवर परिणाम झाला आहे.

सध्या आटपाडी तालुक्यात संसर्गाचे प्रमाण घटत आहे. संसर्ग पूर्ण थांबेल याची खात्री नाही. व्यावसायिक दुकानदारांचे बंदमुळे वीज बिल, जागा भाडे व भांडवल आर्थिक अडचणीत आले आहे. त्याचबरोबर जगण्याचाही प्रश्न गंभीर बनत आहे. व्यावसायिकांची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस अडचणीची बनत आहे. व्यवसाय टिकले नाहीत तर बेकारीत वाढ होण्याचा धोका आहे. व्यावसायिकांनी व्यवसायासाठी बँका व पतसंस्थांचा आधार घेतला. बँकेचे हप्ते थकल्याने सर्वच व्यावसायिक सध्या अडचणीत आले आहे.

Lockdown Impact - असेच ‘बंद-चालू’ सुरू राहिले तर जगणेही अवघड
मोदीजी तुम्हीच सांगा आता जगावं की मरावं ? पाटील यांचा निशाणा

शासन आदेशाने अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद राहिली. त्याचा परिणाम व्यावसायिक व नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होऊ लागला आहे. व्यावसायिकांमुळे संसर्ग पसरत नाही, तर नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे पसरतो हे सिद्ध झाले आहे. लसीकरण सुरू असतानाही व्यवसाय, दुकाने बंद रहात आहेत. त्याचा परिणाम व्यावसायिकांवर अवलंबून असलेल्यांवरही होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com