esakal | लष्करी जवानाला ग्रामस्थांनी गावात घेण्यास केला विरोध : लॉजचा खर्च देतो, पण गावात नको...
sakal

बोलून बातमी शोधा

lockdown quarantine impact in belgaum

कोरोनाने माणसाला माणसापासून दूर केले, तसेच एकमेकांबद्दल जिव्हाळाही वाढविला.

लष्करी जवानाला ग्रामस्थांनी गावात घेण्यास केला विरोध : लॉजचा खर्च देतो, पण गावात नको...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

खानापूर (बेळगाव) : कोरोनाच्या संकटाने लोकांचे जिवन बदलून टाकल्याच्या घटना समोर येत आहेत. कोरोनाने माणसाला माणसापासून दूर केले, तसेच एकमेकांबद्दल जिव्हाळाही वाढविला. अनेक गावांत वाददेखील निर्माण केले, तर कांही गावांतील परंपरागत वादांवर तोडगा निघाला. गावगाडा सोडून परागंदा झालेल्या भूमीपूत्रांना मातीचे महत्व कोरोनाने पटवून दिले. खानापूर तालुक्यातील पारवाडमध्ये मात्र वेगळाच प्रकार घडला असून हा चर्चेचा विषय बनला आहे. लष्करी जवानाला ग्रामस्थांनी गावात घेण्यास विरोध केला. क्वारंटाईनसाठी लॉजचा खर्च द्यायची तयारी गावकऱ्यांनी दर्शविली. 

लॉकडाऊन उठल्यानंतर आता परप्रांतीयांसह लष्करात सेवा बजावणारे जवान सुट्टीवर परतू लागले आहेत. पारवाड येथील एक जवान सुट्टीवर गावी आले. त्यांना संस्थात्मक किंवा घरी क्वारंटाईन होणे अपरिहार्य होते. त्यांनी गावात क्वारंटाईन होण्याची तयारी दर्शविली.परंतू, गावकऱ्यांनी त्यांना गावात क्वारंटाईन होण्यास सक्त विरोध केला. यावरून ग्रामस्थांचा पंचायत विकास अधिकाऱ्यांशी वाददेखील झाला. या वादावर तोडगा निघला नाही. शेवटी गाव सोडून कोठेही क्वारंटाईन व्हा, असा फतवा गावपंचानी काढला. जवानानेदेखील गावाबाहेर क्वारंटाईन होतो, पण लॉजचा खर्च द्या, असा तगादा लावला. 

हेही वाचा- गोव्यास कामास असणाऱ्या रेडीतील तरूणीची आत्महत्या -

लॉजचा खर्च देण्याच्या अटीवर अखेर जवान बेळगावातील एका लॉजमध्ये क्वारंटाईन झाल्याने वादावर पडदा पडला.ग्रामस्थ वर्गणी काढून लॉजचे भाडे भागवणार आहेत, असे समजते. सध्या शाळा सुरू करण्याची घाई शिक्षण खात्याने चालविल्यामुळे बाहेरून येणाऱ्यांना शाळेत क्वारंटाईन करणे अवघड बनले आहे. विशेषत: लष्करातून येणाऱ्या जवानांची मोठी गोची होत आहे. नुकताच तालुक्यातील निट्टूर येथे क्वारंटाईन होण्यास नकार देऊन हुल्लडबाजी केलेल्या तरूणांवर पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. या घटनांमुळे तालुक्यातील बहुतांश गावात वाद उफाळून आले आहेत. तालुका प्रशासनाने यावर तोडगा काढण्याची मागणी होत आहे. 

हेही वाचा- काही सुखद.. ओव्हरफ्लो होण्याचा सर्वात पहिला मान `या` धरणाला -

महिन्याची सुट्टी, 14 दिवस घराबाहेर
लष्करी जवानांना महिनाभराची सुट्टी देऊन गावी पाठविले जात आहे. प्रवासात चार दिवस जात आहेत. त्यानंतर 14 दिवस क्वारंटाईन व्हावे लागत आहे. केवळ 12 दिवस कुटूंबीयांसोबत राहयला मिळत असल्याने नको ती सुट्टी अशी जवानांची भावना झाली आहे. घरी क्वारंटाईन होण्यास गावांमधून विरोध होत असल्याने भलतीच समस्या निर्माण होत आहे. जवानांची तपासणी करून तसे पत्र लष्कराकडून दिले जात असले तरी प्रवासात कोरोनाबाधीताशी संबंध येऊ शकतो, त्यासाठी क्वारंटाईन सक्तीचे असल्याचे तालुका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

loading image