LokSabha 2019 : आघाडीच्या प्रचाराचा आज कऱ्हाडात प्रारंभ

LokSabha 2019 : आघाडीच्या प्रचाराचा आज कऱ्हाडात प्रारंभ

कऱ्हाड - काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या पश्‍चिम महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा प्रचाराचा प्रारंभ आज (रविवारी) येथील सभेने होत आहे. सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या प्रचारसभेस सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे जिल्ह्यातील प्रमुख नेते व पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. 

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीचे सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खासदार उदयनराजे भोसले, आमदार मोहनराव कदम, आनंदराव पाटील, विश्वजित कदम, सारंग पाटील, सत्यजितसिंह पाटणकर, देवराज पाटील, मलकापूरचे उपाध्यक्ष मनोहर शिंदे, अजितराव पाटील- चिखलीकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

आमदार चव्हाण म्हणाले, ‘‘गेल्या पाच वर्षांत मोदी सरकारला कोणतीही ठोस कामे करता आली नाही. शेतकरी, व्यापारी, रोजगार आदींना अच्छे दिन आलेच नाहीत. मोदी सरकारकडून लोकशाहीला घातक काम झाले असून, त्यांनी स्वायत्त संस्थांचे अधिकार काढल्यामुळे हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये मोदी सरकारच्या पराभवासाठी काँग्रेससह २३ पक्ष एकत्र आले आहेत. यामुळे भाजपचा पराभव निश्‍चित आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा पश्‍चिम महाराष्ट्रातील प्रचाराचा प्रारंभ उद्या येथील सभेने होईल. सायंकाळी पाचला दत्त चौकात ही सभा होईल. त्यापूर्वी ज्येष्ठ नेते (कै) यशवंतराव चव्हाण समाधीचे दर्शन घेऊन प्रचारास प्रारंभ होईल. 

दरम्यान, काँग्रेस जिल्हाध्यक्ष रणजितसिंह निंबाळकर यांच्या भाजप प्रवेशासंदर्भातील प्रश्‍नांवर ते म्हणाले, ‘‘निवडणुकीमुळे बऱ्याच अफवा सुरू आहेत. ज्या ठिकाणी भाजपकडे उमेदवार नाहीत, तिथे एक- एक उचलण्याचे सुरू आहे. साम, दाम, दंड, भेद अशी रणनीती अवलंबून मुख्यमंत्र्यांनी आधीच जाहीर केल्याप्रमाणे भाजपचे काम सुरू आहे.’’  

खासदार भोसले म्हणाले, ‘‘केंद्रातील भाजप सरकारकडून गेल्या पाच वर्षांत सर्वच घटकांची दुरवस्था झाली आहे. देशातील शेतकरी, तरुण, व्यापारी देशोधडीला लागले आहेत. निवडणुकीपुरता संकुचित विचार न करता देशात परिवर्तन घडवून आणायचे आहे, तरच देश महासत्ताकडे वाटचाल करेल.’’ ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत उद्या प्रचार सभा होत आहे. त्यास कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे.

..तर मी बिनविरोधच झालो असतो
अंतर्गत नाराजीबाबतच्या प्रश्‍नावर खासदार भोसले म्हणाले, ‘‘राष्ट्रवादीअंतर्गत कुठलेही मतभेद नाहीत. देशात व्यक्ती स्वातंत्र्य, लोकशाही आहे. त्यामुळे कोणीही कुठेही उभे राहू शकते. जर माझ्याकडे जादूची कांडी असती तर मी बिनविरोधच झालो असतो.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com