Election Results : कोल्हापूरमध्ये पहिल्या फेरीत मंडलिक १५ हजारांनी आघाडीवर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मे 2019

कोल्हापूर - कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये पहिल्या फेरीत पाच विधानसभा मतदारसंघात सुमारे 15 हजार मताने शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक आघाडीवर आहेत. पहिल्या फेरीत महाडिक यांना 17197 तर मंडलिक यांना 31931 मते मिळाली आहेत.

कोल्हापूर - कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये पहिल्या फेरीत पाच विधानसभा मतदारसंघात सुमारे 15 हजार मताने शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक आघाडीवर आहेत. पहिल्या फेरीत महाडिक यांना 17197 तर मंडलिक यांना 31931 मते मिळाली आहेत.

मतदार संघ निहाय पडलेली मते

राधानगरी 
पहिली फेरी 
मंडलिक 3152
महाडिक 1075

राधानगरी 
पहिली फेरी 
मंडलिक 3152
महाडिक 1075

करवीर
पहिली फेरी 
मंडलिक 6497
महाडिक 3758

कोल्हापूर दक्षिण 
पहिली फेरी 
मंडलिक 5252
महाडिक 7117

केवळ पश्‍चिम महाराष्ट्राचेच नव्हे, तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या व दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या कोल्हापूरचा खासदार कोण? याचा फैसला आज होत आहे. या दोन्ही मतदारसंघातील निकालाची प्रचंड उत्सुकता असून, यासाठी प्रशासकीय यंत्रणाही सज्ज झाली आहे. दुपारपर्यंत निकालच कल स्पष्ट होईल, तर संपूर्ण निकाल जाहीर होण्यास रात्र होण्याची शक्‍यता आहे. 

जिल्ह्यातील दोन्हीही मतदारसंघात २३ एप्रिल रोजी चुरशीने ७० टक्के मतदान झाले. कोल्हापूर लोकसभेची मतमोजणी रमणमळा येथील गोदामात होत आहे. सकाळी आठ वाजता प्रत्येक विधानसभेची मतमोजणी २० टेबलवर सुरु आहे.

सहा विधानसभा मतदारसंघातील १२० टेबलवरील मते एकत्रित करून पहिली फेरी जाहीर होईल. लोकसभेच्या कोल्हापूर मतदारसंघात अशा २२ फेऱ्या होतील. प्रत्यक्ष यंत्रातील मते मोजण्यापूर्वी टपाली मतांची मोजणी प्रत्येकी सहा टेबलवर होईल. 

कोल्हापूर मतदारसंघात एकूण १८ लाख ७४ हजार ३४५ मतदारांपैकी १३ लाख २५ हजार १७४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

कोल्हापुरात राष्ट्रवादीचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक विरुद्ध शिवसेनेचे प्रा. संजय मंडलिक यांच्यात चुरशीची लढत आहे. मतदारसंघात ‘काँटे की टक्कर’ असल्याने निकालाबाबत उत्सुकता आहे. विविध वाहिन्यांच्या  ‘एक्‍झिट पोल’ मध्ये कोल्हापुरात प्रा. मंडलिक विजयी होतील, असे सांगितल्याने राष्ट्रवादी व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची घालमेल वाढली आहे. 

दृष्टिक्षेपात निवडणूक
- कोल्हापुरात महाडिक-मंडलिक यांच्यात चुरशीचा सामना
- निकालावर उमेदवारांसह नेत्यांचे भवितव्य अवलंबून
- सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ 
- प्रत्येक विधानसभेसाठी २० टेबलवर मोजणी 
- १२० टेबलवरील मतमोजणी एकत्रित करून पहिली फेरी
- कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात २२ फेऱ्या
- दुपारपर्यंत कल, तर सायंकाळी निकालाचे चित्र स्पष्ट
-  कोल्हापुरात ११६० मतमोजणी कर्मचारी
- मतमोजणी केंद्राबाहेर प्रचंड पोलिस बंदोबस्त
- निकालानंतर मिरवणुकीवर बंदी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 Kolhapur constituency