Kolhapur Loksabha 2019 : चारवाजेपर्यंत 52.16 टक्के मतदान 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 एप्रिल 2019

कोल्हापूर - कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये दुपारी चारवाजेपर्यंत 52..15 टक्के मतदान झाले. सकाळच्या टप्प्यात संथगतीने सुरु असणारे दुपारनंतर वाढले. मतदानासाठी गर्दी वाढताना पाहायला मिळत आहे. 

कोल्हापूर - कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये दुपारी चारवाजेपर्यंत 52..15 टक्के मतदान झाले. 

विधानसभा मतदारसंघ निहाय मतदानाची आकडेवारी अशी - (दुपारी चारवाजेपर्यंतची) 

चंदगड 49.50, राधानगरी 54.00, कागल - 56.09, कोल्हापूर दक्षिण 51.71, करवीर 51.24, कोल्हापूर उत्तर 50.00 टक्के एकूण 52.16 टक्के

 मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांच्या विरोधात शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक हे निवडणूक रिंगणार आहेत. कॉंग्रेसमधील नाराजीचा फटका महाडिक यांना बसण्याची चिन्हे आहेत. तर संजय मंडलिक या नाराजीचा फायदा कसा उठवला आहे यावर सर्व चित्र अवलंबून आहे. दुपारी सव्वाबारावाजेपर्यंत या मतदारसंघात 25 टक्के मतदान झाले होते. सकाळच्या टप्प्यात संथगतीने मतदान सुरू होते मात्र अकरानंतर मतदानाला वेग आला आहे. 

विधानसभा मतदारसंघ निहाय मतदानाची आकडेवारी अशी - (दुपारी एकवाजेपर्यंतची) 

चंदगड 40.46, राधानगरी 44.50, कागल - 43.34, कोल्हापूर दक्षिण 39.94, करवीर 44.05, कोल्हापूर उत्तर 40.55 टक्के एकूण 42.16 टक्के

110 वर्षांच्या आजीने येथे मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान लोकसभा मतदार संघात सकाळी अकरा वाजेपर्यंत 25.46 टक्के मतदान झाले होते. सकाळच्या टप्प्यात संथगतीने सुरु असणारे दुपारनंतर वाढले. मतदानासाठी गर्दी वाढताना पाहायला मिळत आहे. 

विधानसभा मतदार संघ निहाय मतदान टक्केवारी (सकाळी अकरापर्यंतची) - 
चंदगड 25.12, राधानगरी 26.94, कागल - 26.25, कोल्हापूर दक्षिण 24.87, करवीर 26.86, कोल्हापूर उत्तर 24.86 टक्के एकूण 25.46 टक्के

दरम्यान, लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले मतदार संघासाठी सकाळी सातपासून मतदानाला उत्साहात सुरूवात झाली. दरम्यान सकाळी 7 ते 9 पर्यंत कोल्हापूरमध्ये 9.76 टक्के तर हातकणंगलेमध्ये 8.70 टक्के मतदान झाले आहे. राधानगरी, करवीर तालुक्‍यासह कोल्हापूर उत्तरमध्ये सरासरी 10.35 टक्के मतदान झाले आहे. 

कोल्हापूर लोकसभा मतदार संघामधील एकूण 18 लाख 74 हजार 345 मतदारांपैकी 1 लाख 82 हजार 947 मतदारांना सकाळी दोन तासात मतदान केले आहे. कोल्हापूरमध्ये सरासरी 9.76 टक्के मतदान झाले आहे. 

बावडा येथे मतदान यंत्रात बिघाड

सकाळी कसबा बावडा, शास्त्रीनगर येथीन नऊ नंबर शाळा येथील मतदान मशिनमध्ये बिघाड झाल्यामुळे काही काळ मतदाना विलंब झाला. मात्र, तिथे असणाऱ्यांना अभियंत्यांनी तत्काळ मशिनची दुरूस्ती करून मतदान यंत्रणा सुरळीत केली. जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रत्येक मतदार केंद्रावर पाळणा घर, दिव्यांगांसाठी व्हिलचेअरची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सकाळी शेतावर, कामावर जाणाऱ्या लोकांनी मतदानाला प्राधान्य दिले. 

कोल्हापूर लोकसभासाठी विधानसभा मतदार संघ निहाय झालेले मतदानाची टक्केवारी : (सकाळी 9 वाजेपर्यंत)

चंदगड - 8.21 
राधानगरी - 10.27 
कागल - 9.97 
करवीर - 10.19 
कोल्हापूर दक्षिण- 10.25 
कोल्हापूर उत्तर- 9.68 

Web Title: Loksabha 2019 Kolhapur voting 9.76 Hatkanangale 8.36 percent voting