Loksabha 2019 : स्वाभीमानीच्या कार्यकर्त्याकडे 75 लाखाचा डबा आला कोठून  - खोत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 एप्रिल 2019

कोल्हापूर -  खासदार राजू शेट्टी यांनी एक नोट, एक वोट संकल्पना राबवली आहे. मात्र, त्यांचा स्वाभिमानी पक्षाचा कार्यकर्ता आणि एका गावचा उपसरंपच असणाऱ्या व्यक्तिच्या घरात एका डब्यात 75 लाख रुपये सापडले. हा पैशाचा डबा कोण देतं, येवढे पैसे आले कोठून? असा सवाल राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी येथे केला. तसेच याचा शोध घ्यावा लागेल, असेही खोत म्हणाले. 

हातकणंगले लोकसभा मतदार संघात प्रचारासाठी श्री खाेत आणि  कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल आले आहेत. यावेळी त्यांनी आज कोल्हापुर येथे पत्रकारांशी संवाद साधला.

ज्यांनी सहकार बुडवला, धरणात, सिंचन विभाग, साखर कारखानदारी बुडवली, अशांना कदापीही सोडणार नाही, अशी भाषणे खासदार राजू शेट्टी करत होते.कॉंग्रेस - राष्ट्रवादीचे भ्रष्ट नेते समुद्राच्या तळामध्ये जरी जावून लपून बसले तरीही त्यांना सोडणार नाही असे शेट्टी म्हणत होते. पण आज त्यांच्याच पोस्टरवर शेट्टी झळकत आहेत.

- सदाभाऊ खोत, राज्यमंत्री

मोंदी सरकारमुळेच शेतकऱ्यांना हमी भाव मिळू लागला असल्याचे कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी सांगितले. श्री. पटेल म्हणाले, शेत मालाला किमान उत्पादन देण्याची प्रथा भाजप सरकारने अमलात आणली आहे. चना डाळवरील आयात कर वाढविल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणारे भाजप हे पहिले सरकार आहे. असेही श्री. पटेल यांनी सांगितले. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेत जातीयवाद आणून जे लोक यातून बाहेर पडले त्यांना गद्दार म्हणून जाहीर करण्याचे काम शेट्टी यांच्याकडून केले जात आहे. त्यांना लोकच आता धडा शिकवतील

- सदाभाऊ खोत, राज्यमंत्री

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 Minister Sadabhu Khot comment