Loksabha 2019 : ब्रेललिपीतील मतपत्रिकेचा कागल तालुक्यात अंध मतदाराकडून वापर

वि. म. बोते
मंगळवार, 23 एप्रिल 2019

कागल - यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्व मतदारांनी मतदान करावे यासाठी निवडणूक आयोगाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले. दिव्यांगांना ब्रेललिपीतील मतपत्रिकादेखील निवडणूक आयोगामार्फत उपलब्ध करण्यात आली होती. पिंपळगाव खुर्द (ता. कागल) येथील शुभम सुभाष चौगुले या दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या मतदाराने केला. 

कागल - यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्व मतदारांनी मतदान करावे यासाठी निवडणूक आयोगाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले. दिव्यांगांना ब्रेललिपीतील मतपत्रिकादेखील निवडणूक आयोगामार्फत उपलब्ध करण्यात आली होती. पिंपळगाव खुर्द (ता. कागल) येथील शुभम सुभाष चौगुले या दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या मतदाराने केला. 

आदर्श मतदान केंद्र, सखी मतदान केंद्र, नवमतदार सेल्फी पॉईंट, पाळणाघर, आरोग्य पथक आदींसह दिव्यांगांनी मतदानापासून वंचित राहू नये म्हणून त्यांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी वाहतूकीची व्यवस्थाही केली गेली. प्रत्येक केंद्रावर व्हीलचेअर उपलब्ध ठेवण्यात आली. या शिवाय दिव्यांगांना ब्रेललिपीतील मतपत्रिकादेखील निवडणूक आयोगामार्फत उपलब्ध करण्यात आली होती. या मतपत्रिकेचा वापर पिंपळगाव खुर्द (ता. कागल) येथील शुभमने केला. 

वयाच्या 21 वर्षी कोल्हापूरच्या गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालत बी. ए.च्या पहिल्या वर्षात शिकत असलेला शुभम चौगुले मतदानासाठी पिंपळगाव खुर्द येथील मतदान केंद्रावर सकाळी अकराच्या सुमारास आईसोबत दाखल झाला. यावेळी केंद्राध्यक्ष एम. डी. बाईत, ग्रामसेवक सात्तापा कांबळे, तलाठी वैशाली कराड, लिपीक आनंदा वाईंगडे, अनिल कांबळे यांनी ब्रेललिपीद्वारे मतदान करण्यासाठी शुभमला सहकार्य केले व प्रेरणा दिली. त्यानंतर शुभमने स्वत:च मतदान कक्षात जाऊन मतदान केले. 

अनेकांनी सांगितले होते की अंध लोकांचे मतदान दुसरे कोणीतरी करतात, अंध व्यक्तीला स्वत: बटन दाबू दिले जात नाही. पण आज मला वेगळा अनुभव आला. मला मतदान केंद्रावर ब्रेललिपीतील माहितीपत्रिका वाचावयास दिली व मतदान यंत्राबाबतची माहिती सांगून मतदानासाठी प्रेरणा दिली. केंद्रावरील सर्व स्टाफ चांगला होता त्यामुळे मतदान करण्यासाठी मला कुठलीही अडचण आली नाही. 

- शुभम चाैगुले

Web Title: Loksabha 2019 Use of voter ballot in black belt from blind voter in Kagal taluka