Loksabha 2019 : उमेदवारांना मिळेनात मतमोजणी प्रतिनिधी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मे 2019

लोकसभेसाठीच्या मतमोजणी अवघ्या पाच दिवसांवर आली आहे. उमेदवारांच्या मतमोजणीसाठी प्रतिनिधींबाबत शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. निकालासाठी विलंबामुळे मतमोजणी प्रतिनिधी मिळेनात, अशी खंत कार्यकर्त्यांनी बैठकीत मांडल्याचे सूत्रांनी सांगितले.

सांगली - लोकसभेसाठीच्या मतमोजणी अवघ्या पाच दिवसांवर आली आहे. उमेदवारांच्या मतमोजणीसाठी प्रतिनिधींबाबत शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. निकालासाठी विलंबामुळे मतमोजणी प्रतिनिधी मिळेनात, अशी खंत कार्यकर्त्यांनी बैठकीत मांडल्याचे सूत्रांनी सांगितले.

मतमोजणी प्रतिनिधी, कागदपत्रांची जुळणी करताना उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे. मतमोजणी प्रतिनिधींचे अर्ज वेळेत न दिल्यास उमेदवारांची पंचाईत होण्याची शक्‍यता आहे.

लोकसभेची मतमोजणी 23 मे रोजी होणार आहे. त्यासाठी प्रशासनाने मतमोजणी प्रतिनिधी व सर्व माहिती सात दिवस आगोदर देण्याचे आदेश काढले होते. आता केवळ पाच दिवस राहिले असतानाही बहुतांश उमेदवारांना सर्व मतमोजणी प्रतिनिधी मिळाले नसल्याचे आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत स्पष्ट झाले. मतमोजणीला लागणारा विलंब हेच मतमोजणी प्रतिनिधी न मिळण्यामागील प्रमुख कारण आहे. मात्र याबाबत प्रशासनाकडून ठोस खुलासाही केला जात नाही.

Web Title: Loksabha Election 2019 Candidate Vote Counting Representative