Loksabha 2019 : उदयनराजे अब्जाधीश उमेदवार

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 October 2019

भाजप-शिवसेना महायुतीचे सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील उमेदवार उदयनराजे भोसले यांनी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात ते अब्जाधीश असल्याचे दिसत आहे.

सातारा - भाजप-शिवसेना महायुतीचे सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील उमेदवार उदयनराजे भोसले यांनी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात ते अब्जाधीश असल्याचे दिसत आहे. 

त्यांच्याकडे १३ कोटी ५६ लाख ८० हजार १९४ रुपयांची जंगम,३५ कोटी ८० लाख ९६ हजारांची स्थावर मालमत्ता, तर १ अब्ज ५७ कोटी २५ लाख १३ हजार १९१ रुपयांची शेतजमीन आहे. त्यांच्याकडे ३७ हजार ९६७ ग्रॅम सोने असून, त्याची किंमत एक कोटी ५७ लाख २३ हजार ९४६ रुपये आहे. लोकसभेनंतर त्यांची जंगम मालमत्ता एक कोटी २४ लाख ९६ हजार १९४ रुपयांनी तर शेतजमिनीची किंमत ४० कोटी ९० लाख १३ हजार रुपयांनी वाढली. लोकसभेच्या वेळी त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे १२ कोटी ३१ लाख ८४ हजारांची जंगम, तर एक कोटी १३ लाख ९ हजारांची स्थावर मालमत्ता होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Udayanraje Bhosale Billionaire candidate Politics