Loksabha Election : ताकारीतून थेट मातोश्रीवर फोन.... कुणी कुणाचे केले कौतुक?

आपणास पूर्वीच्या खासदारांचा काय अनुभव आहे, हे मला माहित नाही. मात्र आपण मला संधी दिल्यास आपले मत वाया जाऊ देणार नाही.
Satyajeet Patil Sarudkar
Satyajeet Patil Sarudkarsakal

किल्लेमच्छिंद्रगड - आपणास पूर्वीच्या खासदारांचा काय अनुभव आहे, हे मला माहित नाही. मात्र आपण मला संधी दिल्यास आपले मत वाया जाऊ देणार नाही. आपल्या विकासाच्या अपेक्षा पूर्ण करीत तुमचा विश्वास सार्थ करू, आणि खासदार कसा असतो, हे दाखवून कामातून दाखवून देवू, असा विश्वास हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सत्यजित पाटील (आबा) यांनी वाळवा तालुक्यातील प्रचार दौऱ्यात बोलताना व्यक्त केला.

मी तुमच्या भागात नवा असलो, तर आम्ही आमच्या भागात गेल्या ३५-४० वर्षापासून काम करीत असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते प्रतिकदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा प्रचार दौरा पार पडला.

उमेदवार सत्यजित पाटील, प्रतिकदादा पाटील यांनी भवानीनगर, ताकारी, किल्लेमच्छिंद्रगड, बेरडमाची, लवणमाची, बिचुद, दुधारी आदी गावांचा प्रचार दौरा पूर्ण करून मतदारांशी संवाद साधला. त्यांना त्या-त्या गावातील मतदारांनीही तितकाच उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयराव पाटील, बाळासाहेब पाटील, संजय पाटील, सुस्मिता जाधव, सर्जेराव देशमुख, संग्राम जाधव, देवराज देशमुख, अलका माने, वैशाली पाटील, जयश्री पवार, शिवसेनेचे शकील सय्यद, योजना पाटील, अलका राजे, रंजना पवार, अनिता जंगम, मानव गवंडी, फजल हवलदार, तसेच पदाधिकारी सहभागी झाले होते.

सत्यजित पाटील म्हणाले, आमचा पूर्वीच्या खासदारांबद्दलचा अनुभव चांगला नाही. आम्ही जीवाचे रान करून त्यांना विजयी केले, मात्र त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेले नाही. आपला अनुभव आमच्यापेक्षा वेगळा असणार नाही. मात्र मी तुमच्या विश्वासाला अजिबात तडा जाऊ देणार नाही.

मी पाच वर्षे जिल्हा परिषद सदस्य आणि १० वर्षे आमदार म्हणून काम पाहिले आहे. माझे वडील १० वर्षे आमदार होते. मीही शेतकरी कुटुंबातील आहे. आम्ही गेल्या ४० वर्षात लोकांची कामे आणि संपर्कातून त्यांचे प्रेम, आशिर्वाद मिळविले आहे.

प्रतिकदादा पाटील म्हणाले, सत्यजित पाटील (आबा) हे शांत, संयमी आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारे आहेत. त्यांनी दहा वर्षे आमदार म्हणून काम करताना राज्य शासना कडून विक्रमी निधी आणत त्यांच्या दुर्गम व डोंगराळ भागाच्या विकासाला मोठी चालना दिली आहे. आपण साहेबांच्याप्रमाणे त्यांना आपल्या मतदारसंघातून मताधिक्य द्यायचे आहे. आपण सर्वांनी घरोघरी मशाल चिन्ह पोचवावे.

यावेळी विनायक पाटील, सुस्मिता जाधव, पं. स. सदस्या रुपाली सपाटे, माजी नगरसेवक शकील सय्यद, शिवसेना महिला जिल्हा संघटक योजना पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.

भवानीनगरचे माजी सरपंच बाळासाहेब पाटील, माजी पं. स. सदस्य भरत कदम, हरिभाऊ सावंत, शंकर मोहिते, चंद्रकांत मेहता, सरपंच इंदूताई ताटे, उपसरपंच पंकज पाटील, ताकारीचे माजी सरपंच अर्जुन पाटील, कमलाकर भांबुरे, शशिकांत पाटील, दिनकर सावंत, दीपक शहा, सुभाष शहा यांच्यासह परिसरातील प्रत्येक गावचे सरपंच- उपसरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताकारीतून थेट मातोश्रीवर फोन -

अलका राजे या शिवसेनेच्या संपर्क प्रमुख या दिवसभराच्या प्रचार दौऱ्यात सहभागी झाल्या होत्या. त्या मतदारांचा प्रतिसाद बघून इतक्या प्रभावित झाल्या की,त्यांनी सायंकाळी थेट मातोश्रीवर फोन लावून दौऱ्याची माहिती दिली. त्यांनी आ. जयंतराव पाटील यांच्या संघटन कौशल्याचे कौतुकही केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com