
Sangli Irrigation Department : ‘महापूर नियंत्रणासाठी येणाऱ्या पैशांचे वाटोळे केले जात आहे. जागतिक बँकेकडून पैसे मिळतात म्हणून गटारी साफ करत असला तर कायमच पुराच्या पाण्यात गटांगळ्या खात बसावे लागणार आहे. हिप्परगी आणि आलमट्टी धरणाच्या उंचीवाढीविरोधात १० जुलैला सकाळी साडेअकरा वाजता सांगली पाटबंधारे विभाग कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती आमदार सतेज पाटील आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज दिली. शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत हा इशारा देण्यात आला.