

सांगली : बस स्थानक परिसरात मोबाईल शॉपीत कोयत्याने खून झाला. संशयितांनी घाटावर ‘रील्स’ बनवल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी गस्तीत वाढ केली. आज दोघांवर कारवाईचा बडगा उगारत पोलिसी खाक्या दाखवला. त्यामुळे आता ‘डॉन’चे धाबे दणाणले आहेत.