
महाबळेश्वर येथे सध्या रात्री अकरा वाजेपर्यंत व्यावसाय सुरु असतात. त्याची वेळेची मर्यादा वाढविणे गरजेचे आहे. हे करीत असताना जेणेकरून पर्यटकांना त्रास होणार नाही व व्यावसायिकांना देखील त्रास होणार नाही. याधर्तीवर पोलिसांनी देखील प्रस्ताव दिला आहे.
महाबळेश्वर : महाबळेश्वरचे वेगळेपण आपण सर्वांनी जपले पाहिजे. पर्यटकांना सुविधा देण्यासाठी प्रयत्नशिल राहू अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाबळेश्वर येथे आले आहेत. त्यांनी आज (शनिवार) महाराष्ट्र राज्य शासन व रेड क्रॉस सोसायटी संचालित बेल एअर हॉस्पिटलला भेट दिली. तेथे सर्व अधिकाऱ्यांसमोर येथील ग्रामीण रुग्णालयाची चित्रफीत दाखवून माहिती सादर करण्यात आली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्वत: हॉस्पिटलची पाहणी केली. त्यानंतर राजभवन येथे जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी सातारा जिल्ह्यातील विविध विकासकामांबाबतचे सादरीकरण केले. वाई पोलादपूर रस्ता, वेण्णालेक बाह्य मार्ग, डि.पी निश्चित नाही, ब वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा मिळविण्यासाठी प्रयत्न, वेण्णा लेक सुशोभीकरण, पालिका हद्दीमधील सर्व पॉईंट विकसित करण्यासाठी निधी, रस्ते व फुटपाथ विकसीत करणे, विद्युत खांब, सुभाषचंद्र बाेस व छत्रपती शिवाजी महाराज चौक विकसित करणे असे विविध प्रस्ताव महाबळेश्वर पालिकेने सादर केले.
नक्की वाचा - Budget 2020 : वास्तवाचे भान हरवलेला आणि केवळ स्वप्नांच्या दुनियेत रमवणारा अर्थसंकल्प - उद्धव ठाकरे
महाबळेश्वर येथे नाईट लाईफच्या धर्तीवर ११ ऐवजी एकपर्यंत वेळ दिला जावा अशीही मागणी करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी स्ट्रॉबेरीबाबत चर्चा, स्टॉबेरी लागवड क्षेत्र वाढविणे, स्टॉबेरी संशोधन केंद्राची बाळासाहेब भिलारे यांनी मागणी केली. तसेच रोपे आयात करण्यापेक्षा इथेच तयार करुन वितरीत करता येऊ शकतील असेही नमूद केले.
हेही वाचा - उद्धव ठाकरेंचे आगमनाने महाबळेश्वरकरांच्या जून्या आठवणी ताज्या
यावेळी महाबळेश्वरच्या घरपट्टी वाढीबाबत, किल्ले प्रतापगड संवर्धनाबाबत निवेदन देण्यात आले. या बैठकीस पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई, उद्याेगमंत्री सुभाष देसाई, अजय चौधरी, शांती कन्स्ट्रक्शनचे डी.एल.शिंदे, जयसिंग मरिवाला, फादर टॉमी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, सिव्हील सर्जन अमोल गडीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, प्रांताधिकारी संगिता राजापुरकर - चौगुले, तहसिलदार सुशमा पाटील -चौधरी, मुख्याधिकारी अमिता दगडे - पाटील उपस्थित हाेते.