

Mahalaxmi Express Robbery Near Salpe Railway Station
esakal
Mahalaxmi Express Robbery Near Salpe Railway Station : मुंबईहून कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या महालक्ष्मी एक्स्प्रेसवर दरोडा पडल्याची घटना समोर आली आहे. सातारा जिल्ह्यातील सालपे रेल्वे स्थानकाजवळ रविवारी मध्यरात्री ही घटना घडली. प्रवासी गाढ झोपेत असताना चोरट्यांनी सिग्नल यंत्रणेच्या वायर कापून रेल्वेगाडी थांबवली आणि दोन महिला प्रवाशांचे सोन्याचे दागिने हिसकावून नेले. या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा