Maharashtra Farm Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय! 2 लाखांपर्यंत कर्जमाफी अन् 48 हजार कोटींची वीज बिले माफ; काय म्हणाले आमदार गाडगीळ, खाडे?

Maharashtra Farm Loan Waiver Scheme 2026 : महाराष्ट्र सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दोन लाखांपर्यंत कर्जमाफी, ४८ हजार कोटींची वीजबिल थकबाकी माफी आणि ५६ लाख शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
Maharashtra Farm Loan Waiver Scheme 2026

Maharashtra Farm Loan Waiver Scheme 2026

esakal

Updated on

सांगली : राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा लाभ देणारी ‘पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ ऐतिहासिक (Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver) आहे. ५० हजार रुपयांचा लाभ देण्याची मर्यादा काढून टाकण्यात आली असून, शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. तसेच ४८ हजार कोटींची कृषी वीज बिले माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे बळीराजाला दिलासा मिळाला आहे, अशी माहिती आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com